बिहार विधानसभा 'Election' जाहीर, पण हे आहे मुंबई 'कनेक्शन'
Bihar Election And Mumbai: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत मुंबईचं नेमकं कनेक्शन काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

पटना: निवडणूक आयोगाने आज (6 ऑक्टोबर) बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. बिहारमधील विधानसभेच्या 243 जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर 2025 असं दोन टप्प्यात मतदान होईल, तर 14 नोव्हेंबर 2025 रोजी निकाल जाहीर केला जाईल.
निवडणूक बिहारमध्ये पण मुंबई कनेक्शन काय?
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत असली त्याचा काहीसा परिणाम हा मुंबईत देखील पाहायला मिळतो. कारण कोट्यवधी बिहारी नागरिक हे मुंबईत वास्तव्य करतात. त्यामुळेच मुंबईतील बिहारी मतदारांकडे सर्वच पक्षांचं विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान, बिहारमधील या निवडणुकीत बेरोजगारी आणि स्थलांतर ही प्रमुख मुद्दे ठरणार आहे, ज्यात बिहारमधून कोट्यवधी नागरिक मुंबईसारख्या शहरांत पोटापाण्यासाठी स्थायिक झाले आहेत. मुंबईत कोट्यवधी बिहारी राहतात, ज्यांचा बिहारमधील मतदारसंघांवर मोठा प्रभाव पडू शकतो. भाजपसारख्या पक्षांनी या मतदारांना लक्ष्य करून विशेष अभियान देखील सुरू केले आहे.
हे ही वाचा>> परळी, पंढरपूर, बार्शी ते संगमनेर,राज्यातील 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी
मुंबई हे बिहारमधून स्थलांतरितांच्या दृष्टीने एक प्रमुख शहर आहे. मोठ्या प्रमाणात बिहारी नागरिक हे मुंबईत राहतात, ज्यातील बहुसंख्य मजूर, दैनंदिन कामगार आणि छोट्या व्यवसायात गुंतलेले आहेत.
विशेषत: फार्मा, सुरक्षा, हॉटेल, रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रांत ते सक्रिय आहेत. मात्र, बिहारमधील मतदार यादीत त्यांचे नाव असले तरी, मतदानासाठी परत जाणे कठीण आहे. विशेषत: निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मुळे, ज्यात लाखो मतदारांची नावे काढली गेली, अशा स्थलांतरितांना परत जाऊन फॉर्म भरावे लागणार आहेत.