Eknath Shinde: '..त्यावर माझं भवितव्य अवलंबून आहे', CM शिंदे कोल्हापुरात असं का बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान
एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान
social share
google news

CM Eknath Shinde Kohlapur: कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (my future will depend on getting a good victory in the upcoming lok sabha elections why did cm eknath shinde say this in kolhapur)

'लोकसभा निवडणुका या आपल्या पक्षाच्या पहिल्या निवडणुका आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपल्याला आघाडी मिळाली पाहिजे. याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. माझंही आणि तुमचंही.. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा..' असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. 

एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री केल्यापासून भाजपमध्ये बरीच धुसफूस सुरू आहे. त्यामुळेच जर लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा परफॉरमन्स चांगला नसेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवूनच एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'...याच्यावरच माझं भवितव्य ठरणार आहे' 

'निवडणुका आल्या.. अनेक लोकांनी त्यावर भाष्य केलेलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच लागेल.. या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. लोकसभा ही पहिली निवडणूक आपल्या पक्षाची आहे. या निवडणुकीत निवडणूक याद्यावर लक्ष ठेवा.. शिवसेना वाढवत असताना शाखांचं जाळं निर्माण करा.. गाव तिथे शाखा काढा.. गावाच्या वेशीवर शिवसेनेचा फलक लावा.. घर तिथे शिवसैनिक करा..' 

'या लोकसभेमध्ये, विधानसभेत.. प्रत्येक विधानसभेत 50 ठिकाणी आपल्या शिवसेनेला आघाडी मिळाली पाहिजे याच्यावर काम करा.. आमदार असेल, पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल.. हा तुमचा रिपोर्ट कार्ड असेल. याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. माझंही आणि तुमचंही.. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा..' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.  

ADVERTISEMENT

'तिकिट नाही मिळालं म्हणून...'

'तिकीट नाही मिळालं तरी इतर निवडणुका येतील. तिकीट एकच असतं. तिकीट नाही मिळालं म्हणून सगळं संपलं असं होत नाही. अनेक सत्तेची पदं असतात.' 

ADVERTISEMENT

'काम करत राहा आपल्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त... मुंबईमध्ये कमी या.. तुमचं काय काम असेल तर फोनवरून सांगा.. आठवड्यातून एखाद दिवस समजू शकतो. पण दररोज मुंबईमध्ये येणं बंद करा. शेवटी लोकांशी तुमचा कनेक्ट पाहिजे. कनेक्ट तुटला की, सगळंच सुटलं..' असा सल्लाही एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला..  

'म्हणून सगळे पदाधिकारी, चांगले आणि ताकदीचे पदाधिकारी नेमा.. आपल्या मागे-पुढे फिरणारा पदाधिकारी बिलकूल नेमू नका. तो जर नेमला तर तुम्ही स्वत:चं नाही तर आपल्या शिवसेनेचं नुकसान करत आहात हे लक्षात ठेवा.' असंही शिंदेंनी ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितलं. 

'तुम्ही फेसबुकवर खेळायचे.. हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा..'

'कोरोना काळात तुम्ही फेसबुकवर खेळायचे.. हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा.. फिल्डवर काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे. कार्यालयात बसून माहिती घेऊन निर्णय घेणारा हा एकनाथ शिंदे नाही.. त्यामुळे मला कोणीच फसवू शकत नाही. अडीच वर्ष फेसबुक लाईव्हवर काम करणारा आणि हा एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करणारा.. जनता सुज्ञ आहे.. जो काम करणार आहे त्याच्या मागे जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे घरबसल्या उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही..' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका यावेळी केली. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT