Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना फासलं काळं, पुण्यात काय घडलं?

ADVERTISEMENT

Namdev Jadhav was black-faced NCP workers for criticizing Sharad Pawar
Namdev Jadhav was black-faced NCP workers for criticizing Sharad Pawar
social share
google news

Sharad Pawar: मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) खरे मारेकरी हे शरद पवार आहेत असं वक्तव्य नामदेव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत नामदेव जाधव (Namadev Jadhav) यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला होता. तर आज भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याला परवानगी नाकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांचा बचाव करत त्यांना कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न झाला मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावरही काळं फेकण्याचा प्रयत्न केला.

पवार आरक्षणाचे मारेकरी

नामदेव जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणावरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्याचवेळी त्यांनी नामदेव जाधव ज्यावेळी पुण्यात येतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

हे ही वाचा >> मराठा आंदोलक पेटले, भुजबळांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

त्यानंतर ते आज पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असतानाच पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले. त्यावेळी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

…अन् काळं फासलं

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी व पर्यटनातून उद्योजकतेकडे या कार्यक्रमाचे आयोजन भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले होते, मात्र सुरक्षिततेच्या कारणावरुन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर नामदेव जाधव मध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळताच त्यांना काळं फासत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलतान सांगितले.

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘तुम्ही महाराज आहात ना मग…’, छगन भुजबळांच संभाजीराजेंना प्रत्युत्तर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT