मराठा आंदोलक पेटले, भुजबळांच्या ताफ्यासमोर टायर जाळून निषेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

nashik district Igatpuri maratha protesters protested burning tires front minister chhagan bhujbal convoy
nashik district Igatpuri maratha protesters protested burning tires front minister chhagan bhujbal convoy
social share
google news

Chhagan Bhujbal: शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून वेगळी चूल मांडणाऱ्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या सोबत जाऊन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभा (OBC Elgar Mahasabha) घेतली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्यावर छगन भुजबळ यांनी 2 वर्षं तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली होती आणि आज दिवाळीतही खातो. मी कष्टाची भाकरी खातो, मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असं म्हणत मंत्री भुजबळांनी त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

भुजबळांचा आंदोलनकर्त्यांना सवाल

त्यावरुनच आजच्या छगन भुजबळ यांच्या इगतपुरीत तालुक्यातील दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर टायर जाळत काळे कपडे दाखवण्यचा प्रयत्न केला. त्यामुळे आता जरांगे आणि भुजबळ वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या ताफ्यासमोर टायर जाळल्यानंतर भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आम्ही आमचं दुःख मांडलं आहे, तेही मांडायचं नाही का असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> Crime : चिमुकल्याचा घोटला गळा अन् बेडमध्ये लपवला मृतदेह, काकाने पुतण्याला का संपवलं?

कुठला देव झाला तुझा

छगन भुजबल यांनी कालच्या एल्गार सभेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला होता. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतान त्यांचे नाव न घेता टीका केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा, अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुनच आजचे वातावरण तापले होते. त्यातच आज छगन भुजबळ यांचा आज इगतपुरी तालुक्यातील मोडाळेमध्ये विकास कामांचा लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर ते पुन्हा नाशिककडे निघाले होते. त्यावेळी अज्ञात आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर टायर जाळत काळे कपडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे वाचलं का?

आमचा विरोध नाही

छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर अज्ञात आंदोलकांनी टायर जाळत काळे कपडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचबरोबर कालच्या त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पोलीस तक्रार देण्यासंदर्भातही चर्चा केल्या जात आहेत. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आमचं दुःख आम्ही मांडायचं नाही का. आमचा आरक्षणाला विरोध नाही तर त्यांचे आरक्षण त्यांना द्यावे, आणि आमचं आरक्षण आम्हाला राहू द्या, तर आमची घरंदार जाळू नका हे असं बोलणंसुद्धा वाईट आहे का असा सवाल त्यांनी आंदोलनकर्त्यांना केला आहे. समाजात वितुष्ठ आम्ही नाही तर ज्यांनी केले त्यांना विचार, ज्यांनी आमदारांची घरं जाळली, ज्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकले त्यांना जाब विचारा असंही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हे ही वाचा >> Nalasopara Crime : बापच झाला सैतान! मुलीवर आधी बलात्कार, नंतर केलं असं काही की जीवच गेला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT