NCP Controversy: राष्ट्रवादी कुणाची ? शरद पवार-अजितदादा आमनेसामने…
राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग बाजू नांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
NCP Crisis : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) फुटीमुळे जोरदार वादंग माजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या वादावर आज भारतीय निडणूक आयोगापुढे (Election Commission of India) सुनावणी (Hearing) होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काका पुतणे आता आमने सामने आल्याने पक्षाच्या निर्णयाबाबत आज नेमका काय निर्णय होणार याची उत्सुकता साऱ्याने लागली आहे.
ADVERTISEMENT
बाजू कोण मांडणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्यावर निवडणूक आयोगापुढे आज दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग यांच्याकडून बाजू मांडली जाणार आहे.
शरद पवारांची अनुपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद टोकाला गेला असला तरी आजच्या दिवशी होणारी महत्वाच्या सुनावणीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्षच गैरहजर राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शरद पवार या सुनावणीला गैरहजर राहणार असल्यामुळेही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…
त्याच उमेदवारांच्या सह्या
शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर गुरुवारी बोलताना सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आलेल्या 70 प्रस्तावावर माझ्याच उमेदवारी अर्जावर फुटून गेलेल्या उमेदवारांच्या सह्या होत्या, असा खोचक टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.
त्या लोकांचा वाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी ज्यावेळी निवडणूक झाली होती. त्यावेळी आज फुटलेल्या उमेदवारांपैकी 70 उमेदवारांनी माझ्याच अर्जावर सह्या केल्या होत्या. मात्र आज तिच लोकं राष्ट्रवादी नेमकी कुणाची हा वाद निर्माण करत असल्याचे शरद पवारांनी काल बोलताना सांगितले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांची मौज, सामनातून सरकारवर आगपाखड
दोन्हीकडून प्रतिज्ञापत्रं
राष्ट्रवादीसाठी शरद पवार गटाकडून 9 हजार प्रतिज्ञापत्र दाखल केली गेली आहेत तर अजित पवार गटाकडून 6 ते 7 हजार प्रतिज्ञापत्रं सादर केली गेली आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटासाठी आजची सुनावणी महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT