NCP Crisis : अजित पवारांनी थोपटले दंड, शरद पवार ECI च्या कोर्टात, काय झालं?

भागवत हिरेकर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर पहिली सुनावणी घेतली. या सुनावणीसाठी शरद पवार हे स्वतः हजर होते. यावेळी अजित पवार गटाकडून युक्तिवाद करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यात आला.

ADVERTISEMENT

Ajit Pawar vs Sharad Pawar : election commission hearing on ncp split latest Updates
Ajit Pawar vs Sharad Pawar : election commission hearing on ncp split latest Updates
social share
google news

Election Commission Hearing on Ncp : राष्ट्रवादी काँग्रेससाठी काका आणि पुतण्यामधील कायदेशीर लढाई सुरू झालीये. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बाजू मांडण्यास सांगितले होते. शुक्रवारी (६ ऑक्टोबर) पहिली सुनावणी झाली. या सुनावणीसाठी शरद पवार प्रत्यक्ष हजर झाले. शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने समन्स बजावलेले होते.

अजित पवार यांनी बंड केले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील ३८ आमदार फुटले. अजित पवार गट भाजपसोबत जाऊन युतीच्या सत्तेत सहभागी झाला. पण, त्यानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या राजकीय लढाईची सुरूवात झाली. शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वादही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला.

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ४ वाजता सुनावणीला सुरूवात झाली. दोन्ही गटाचे वकील सुनावणीसाठी हजर होते. या सुनावणीसाठी शरद पवार प्रत्यक्ष हजर होते.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय झालं, जाणून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp