Rohit Pawar : “राष्ट्रवादी फुटली नाही”, रोहित पवारांनी सरळ कारणच सांगितलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad pawar meeting kolhapur rohit pawar
Sharad pawar meeting kolhapur rohit pawar
social share
google news

Rohit Pawar Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सातारा जिल्ह्यातील दहिवडीमधून केंद्रावर निशाणा साधल्यानंतर आमदार रोहित पवारांनी राज्यातील भाजपवर सडकून टीका केली. कोल्हापूरातील (Kolhapur) दसरा चौकातून बोलताना रोहित पवार यांनी आपला नाद खुळा असून आपला विषय लई हार्ड आहे म्हणत कोल्हापूरकरांच्या भावनेलाच हात घातला. यावेळी वटवृक्ष आणि पारंब्यांची उपमा देत शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या अजित पवार यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांना वटवृक्ष म्हणत हा वटवृक्ष पारंब्यावर अवलंबून नसून तो स्वतंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. (ncp mla rohit pawar criticized bjp ncp meeting in kolhapur)

ADVERTISEMENT

राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव

आमदार रोहित पवार यांनी बोलताना कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेत दसरा चौकाचे ऐतिहासिक महत्वही त्यांनी सांगितले. ज्या ज्या चांगल्या गोष्टींचे सुरुवात होते, राजर्षी शाहू महराजांनी ज्या ज्या चांगल्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या गोष्टी ज्या दसरा चौकात सुरुवात केल्या त्याच दसरा चौकातून ही सभा होत असल्यामुळे आपला विषय हार्ड असणार आहे असा थेट इशाराच रोहित पवार यांनी भाजपला दिला आहे.

हे ही वाचा>> Sharad Pawar Ajit Pawar: ‘पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं की…’, पवारांच्या विधानाने खळबळ

मी जागा घेणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यानंतर रोहित पवार यांच्यावर टीका होऊ लागली होती. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी जागा घेण्यासाठी आलो नाही तर पुरोगामी विचार जपण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करत असल्याचे सांगत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

हे वाचलं का?

83 वर्षाचा युवक

आजही 83 वर्षाचा युवक म्हणत शरद पवार पुरोगामी विचार जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी कसे फिरत आहेत. त्याची दखल घेत युवक आणि शेतकऱ्यांसाठी लढत आहेत अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

हे ही वाचा>>  MOTN : शाह, गडकरी की योगी… मोदींचा उत्तम उत्तराधिकारी कोण? लोक म्हणतात…

‘राष्ट्रवादी’  ही तुमची ताकद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यानंतर होणाऱ्या टीकेवर बोलताना रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले की, राष्ट्रवादी फुटली नाही कारण राष्ट्रावादी हा विचार आहे. तशीच राष्ट्रवादी काँग्रेस ही तुमची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता 2024 मध्ये अशी एकजूट दाखवून तुम्ही प्रतिगामी विचारांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम करुया असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT