NCP: ‘लहरी माणूस, दोन चमत्कार…’, PM मोदींवर शरद पवारांची पुणेरी टोलेबाजी
Sharad Pawar vs BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच इतर मुद्द्यांवरून देखील त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar: पुणे: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचं नाव न घेता बरेच टोले लगावले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे तसे निर्णय घेतले जात आहेत.’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) टीकेची झोड उठवली. (ncp president sharad pawar strongly criticized pm narendra modi government on demonetisation investigative agency or all other issues)
‘2000 रुपयांच्या बाबतीत काही तक्रारी आल्या आहेत. म्हणजे यासंबंधीचा जो निर्णय घेतलाय… एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत तशा प्रकारचे निर्णय हल्ली घेतले जातात. मागे अशाप्रकारचा एक निर्णय घेतला.. खूप लोकांचं नुकसान झालं.’ अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
पाहा पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले:
‘100 कोटीचे आरोप झाले.. लोकांना धक्का बसला..’
‘ज्या तपास यंत्रणा आहेत त्याचा गैरवापर कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं आहे. आमच्याकडे यादी आहे की, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या 10 लोकांना चौकशीसाठी बोलावलं गेलं. काही लोकांवर अॅक्शनही घेतली. अनिल देशमुख… यांना जवळपास 13-14 महिने तुरुंगात ठेवलं.’
‘त्यांच्यावर सुरुवातीला केस होती की, त्यांनी शैक्षणिक संस्थेला 100 कोटी घेतले असा आरोप होता. चौकशीच्या नंतर जे आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये ती 100 कोटीची रक्कम दीड कोटींवर आली. याचा अर्थ किती अतिरंजित असे आरोप केले जातात. लोकांच्या समोर पहिल्यांदा जे आरोप गेले ते 100 कोटीचे झाले. लोकांना धक्का बसला.. काय चाललंय हे.. या मंत्र्याकडे 100 कोटी वैगरे-वैगरे… म्हणजे त्यांच्या बदनामीचं काम केलं. आता ते सांगतायेत की, 1.50 कोटीची रक्कम..’










