NCP: शरद पवारांनी खडसावून सांगितलं तरी रुपाली चाकणकरांनी ऐकलंच नाही!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sharad Pawar Photo: मुंबई: ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. त्यांनी माझा फोटो वापरू नये.’ अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला आज (4 जुलै) खडसावून सांगितलं. मात्र त्यानंतरही अजित पवारांच्या गटात गेलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी त्यांचं अजिबात न ऐकता शरद पवारांचा फोटो वापरला आहे. (ncp rupali chakankar ajit pawar group photos sharad pawar no one else should use his photos jitendra awhad criticized maharashtra politics news marathi)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी आपला खुंटा अधिक बळकट करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी उद्या (4 जुलै) आपल्या गटाची एक बैठक आयोजित केली आहे. ज्यासाठी राज्यभरातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना येण्याचं आवाहन केलं आहे.

याच बैठकीचं निमंत्रण रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियामध्ये शेअर केले आहे. ज्यावर त्यांनी शरद पवार यांचा फोटो ठळकपणे वापरला आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच शरद पवार यांनी खडसावून सांगितलं होतं की, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेल्या पक्षाशिवाय इतर कोणीही त्यांचे फोटो वापरू नये. असं असताना शरद पवारांच्या या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करुन रुपाली चाकणकर यांनी पवारांचा फोटो ते देखील गटाच्या बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवरच छापला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांकडून बैठकीचं निमंत्रण

रुपाली चाकणकर म्हणतात, तो आमचा अधिकार आहेच…

दरम्यान, याबाबत जेव्हा रुपाली चाकणकर यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘आदरणीय साहेब आमचे दैवत आहेत. साहेबांचा विचार घेऊनच आम्ही संघटनेपासूनचं राजकारण सुरू केलं आणि माझ्यासारख्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांनी संघटना असेल पक्ष असेल त्यांनी साहेबांचा विचार घेऊन समाजकारण करत आलोय. आजही आमची तीच विचारधारा आहे.’

हे ही वाचा >> ‘…मग सत्तेत राहायचं कशाला?’, अजित पवारांची एन्ट्री, संजय शिरसाट काय बोलले?

‘आजही आदरणीय साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, दैवत आहेत.. त्यामुळे हृदयात स्थान आहेच. निश्चितपणाने कदाचित साहेबांनी हे जरी वक्तव्य केलं असेल तरी वक्तव्य केलं असेल तरी मला असं वाटतं की, कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो अधिकार आहे.’ असं रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

‘तुमचे दिल्लीचे नेते आहेत त्यांचे वापरा फोटो’, आव्हाडांचा चाकणकरांना टोला

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चाकणकरांना जोरदार टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

आव्हाड म्हणाले की, ‘जिवंत माणूस जेव्हा सांगतोय की, माझे फोटो वापरायचे नाही तर विषय संपला. तुमच्याकडे आहेत ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वैगरे.. कुठले-कुठले त्यांचे फोटो वापरा ना.. कशाला पाहिजे शरद पवार?’

हे ही वाचा >> Exclusive: अजित पवारांसह 9 जणांची आमदारकी जाणार?, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…

‘शरद पवारांची विचारधारा नको.. शरद पवारांचे आदेश पाळायचे नाहीत. ते आम्हाला मान्य नाहीत सांगायचं पत्रकार परिषदेत एक मान्यवर असं म्हणातात.. असं म्हणायचं आणि शरद पवारांचा फोटो पण वापरायचा..’ असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे.

‘माझा विचारांशी द्रोह केलेल्यांनी..’, पाहा पवार नेमकं काय म्हणालेत:

‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्याचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये.’ अशा कठोर शब्दात शरद पवार यांनी अजितदादांच्या गटाला सुनावलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT