शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम, पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचेचे नेते असल्याचे विधान गेल्या आठवड्यात केले होते. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचेचे नेते असल्याचे विधान गेल्या आठवड्यात केले होते. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभ्रम आहे,पण मला वाटत शरद पवार तो दुर करतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. (ncp sharad pawar role confusion in maha vikas aghadi congress prithviraj chavan reaction)
ADVERTISEMENT
काँग्रेसच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी तो प्रश्न सोडवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना आमची काय गरज लागणार नाही. शरद पवार या संदर्भात बैठका घेत आहे. लवकरच या गोष्टीवर स्पष्टीकरण मिळेल, असा विश्वास पृ्थ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : LPG Price : सत्ताधाऱ्यांना INDIA ने घाम फोडला, दोन बैठकीतच गॅस स्वस्त केले…
पृ्थ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, शरद पवार गटाची कोर्टाची देखील तयारी चालली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदार आणि दोन खासदारांवर निलंबनाची कारवाई देखील राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय़ होईल,असे देखीस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
शरद पवार निश्तितच इंडिया आघाडीत ते राहतील. शरद पवार हे इंडिया आघाडीचे घटक आहेत. पटना, बंगळुरूला ते उपस्थित होते. आणि मुंबईतल्या ही बैठकीला ते आणि त्याचे सहकारी उपस्थित राहतील, असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीसोबत जे घटक घटक नरेंद्र मोदीचा पराभव करण्यास सोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Dilip walase Patil : ‘…पवार साहेब तर आमच्या’, अजितदादांबरोबर गेलेल्या ‘त्या’ नेत्याची भावनिक साद
शरत पवारांचे विधान काय?
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचे नेते आहेत असे वक्तव्य केले होते. यावर माध्यमांनी शरद पवारांना विचारले असता त्यांनी सुप्रिया सुळेच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही.फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फुट कधी येते. जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर,अशी स्थिती तिकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT