छगन भुजबळ ते संजय बनसोडे, राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना मिळाली ही कार्यालये
राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याचे नेमके कार्यालय कुठे असणार आहे, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

2 जूलै रोजी राष्ट्रवादीत उभी फुट पडली आणि अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अद्याप कोणत्याच मंत्र्याला कोणतेच खाते वाटप झाले नाही आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. असे असतानाचा आता राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याचे नेमके कार्यालय कुठे असणार आहे, हे जाणून घेऊयात. (ncp these 8 minister got office room chhagan bhujbal ajit pawar maharashtra politics)
मंत्र्यांना वाटप झालेली दालने
मंत्री छगन भुजबळ : मंत्रालय मुख्य इमारत, दुसरा मजला, दालन क्र. 201 दक्षिण बाजू
मंत्री हसन मुश्रीफ : मंत्रालय विस्तार इमारत, चौथा मजला, दालन क्र. 407
मंत्री दिलीप वळसे-पाटील : मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्र. 303, उत्तर बाजू