Nilesh Rane: आधी अजित पवारांवर गलिच्छ टीका, नंतर काही तासातच Tweet हटवलं!
Nilesh Rane offensive language Tweet: मुंबई: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीतील (Kasba-Chinchwad By Poll) प्रचारादरम्यान पवार आणि राणेंमध्ये चांगलीची जुंपली आहे. चिंचवडमधील एका प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका केली. त्यांची हीच टीका नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंना (Nilesh Rane) […]
ADVERTISEMENT

Nilesh Rane offensive language Tweet: मुंबई: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीतील (Kasba-Chinchwad By Poll) प्रचारादरम्यान पवार आणि राणेंमध्ये चांगलीची जुंपली आहे. चिंचवडमधील एका प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका केली. त्यांची हीच टीका नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंना (Nilesh Rane) मात्र चांगलीच झोंबली. ज्यानंतर त्यांनी अजित पवारांवर ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून निशाणा साधला. मात्र, अजित पवारांवर टीका करताना निलेश राणेंनी अतिशय गलिच्छ भाषेचा वापर केल्याचं समोर आलं आहे. (nilesh rane first criticized ajit pawar with offensive words then deleted tweet within hours)
अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर निलेश राणेंनी धरणवीर, XXX अशा भाषेचा वापर करत त्यांनी सलग चार ट्विट पोस्ट केले.
पाहा निलेश राणे यांचे नेमके ट्विट काय आहेत: