नितीन गडकरींनी प्रत्येक घरी पोहोचवलं किलोभर मटण, तरीही…; निवडणुकीचा ‘तो’ किस्सा काय?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

nitin gadkari told election story we delivered 1 kg of savji Mutton to the house but we lost election
nitin gadkari told election story we delivered 1 kg of savji Mutton to the house but we lost election
social share
google news

नागपूर : मी 1 किलो सावजी मटण घराघरात पोहोचवले होते, पण निवडणूकीत आमचा पराभव झाला. नागरीक हुशार असतात, मत ज्याला द्यायचंय त्यालाच देतात, असा इटरेस्टींग किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितला आहे. नागपूरात (Nagpur) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती.यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी निवडणूकीतला हा किस्सा सांगितला आहे. (nitin gadkari told election story we delivered 1 kg of savji Mutton to the house but we lost election)

नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणतात की, आमच्याकडे राजकारणात ठरलेले आहे. लोक म्हणतात खासदारकीचं तिकीट द्या, आमदारकीचं तिकीट द्या, नाहीतर एमएलसी बनवा, महामंडळावर पाठवा. नाहीच काही शक्य झाले तर मेडीकल कॉलेज द्या. तेही शक्य नसेल तर इंजिनीयर कॉलेज द्या, आणि तेही नसेल तर डीएड, बीएड कॉलेज द्या. तरीही नसेल तर शेवटी प्राथमिक शाळा द्या. म्हणजे काय होईल, ”मग शिक्षकाचा अर्धा पगार आम्ही, अर्धा पगार तुम्ही आणि गावोगावी रोजगार हमी”, असा डायलॉंग नितीन गडकरींनी मारताच कार्यक्र्मात हशा पिकला. तसेच असा देश बदलणार नाही, असे देखीन नितीन गरकरी यांनी पुढे नमूद केले.

हे ही वाचा : ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवा पायंडा सुरू झाला’, फडणवीसांनी काढला इतिहास

पराभव तुम्हाला खूप काही शिकवत असतो. कारण विजयाच्या अहंकारात आणि उन्मादात माणसाला विचार करायला वेळच मिळत नाही. हा वेळ मिळतो तेव्हा त्याचा पराजय झालेला असतो. पण कुठलाही पराभव हा शेवटचा पराभव नसतो, असा मोलाचा सल्ला देखील नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थितांना दिला. याचसोबत नितीन गडकरी यांनी पुढे निवडणूकीत सावजी मटण वाटल्याचा किस्सा देखील सांगितला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सावजी मटणाचा किस्सा काय?

पोस्टर लावून, बॅनर लावून, खाऊ-पिऊ घालून लोक निवडूण येतात यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे असे नितीन गडकरी यांनी म्हणतं, मी अनेक निवडणूका लढल्या आहेत. मी ही प्रयोग करून चुकलो, मी सर्वच प्रयोग केले आहेत, असे देखील गडकरी म्हणाले. तसेच एका निवडणूकीत मी 1 किलो सावजी मटण घराघरात पोहोचवले, पण निवडणूकीत आमचा पराभव झाला. काही होत नाही, लोक हुशार आहेत, जे देतात त्यांचे खातात, पण मत द्यायचंय त्यालाच देतात, असा किस्सा नितीन गडकरींनी सांगितला.

तसेच माणसाच्या मनात जेव्हा तुम्ही विश्वास निर्माण कराल. तेव्हा जात, पंत, भाषेच्या वर उठून तो तुमच्यावर प्रेम करेल. त्यावेली कोणत्याही पोस्टर, बॅनरची गरज लागणार नाही. कोणतीही आमिषे दाखवण्याची गरज भासणार नाही. कारण त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दलचा विश्वास असतो, असे देखील नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘रोहित पवारांचं आंदोलन’, अजित पवारांनी टोचले कान, उदय सामंतांची मध्यस्थी यशस्वी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT