Odisha Train Accident : “मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती का?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

The country has been shaken by the accident of three trains in Balasore, Odisha. Uddhav Thackeray's Shiv Sena has now targeted Prime Minister Narendra Modi over this accident.
The country has been shaken by the accident of three trains in Balasore, Odisha. Uddhav Thackeray's Shiv Sena has now targeted Prime Minister Narendra Modi over this accident.
social share
google news

ओडिशातील बालासोरमध्ये तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. सरकारी आकडेवारीनुसार यात 288 जणांचा मृत्यू झाला आहे, हजारापेक्षा अधिक जखमी झाले आहेत. या अपघाताच्या कारणाची (who is responsible for odisha train accident) चर्चा सुरू असताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. (odisha train accident how many deaths)

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखातून अनेक मुद्दे उपस्थित करत अपघाताच्या जबाबदारीवरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनेने म्हटलं आहे की, “मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. नेहमीप्रमाणे यासाठी मानवी चूक जबाबदार आहे की तांत्रिक बिघाड यावर आता खल सुरू झाला आहे. तो पुढेही होत राहील, पण अपघातात हकनाक मरण पावलेले प्रवासी आणि त्यांची कुटुंबे यांचे काय? त्यांची यात काय चूक होती?”, असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा >> Odisha Train Accident Reason : अखेर रेल्वे अपघाताचं कारण सापडलं!

“मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचा विकास आणि सुरक्षितता यासंदर्भात जे दावे ठोकले जात आहेत, त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही दुर्घटना आहे. बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली आहे”, असं म्हणत सरकारच्या योजनांवरच शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे.

हे वाचलं का?

रेल्वे अपघात : ‘कवच’वरून मोदी सरकारला सवाल

शिवसेनेने कवचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. “दोन रेल्वेंमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ‘संरक्षण कवचा’चा उदोउदो रेल्वेमंत्र्यांनी गेल्या वर्षी केला होता. हे संरक्षण कवच म्हणजे रेल्वे दुर्घटना रोखणारी मोठी क्रांती (भक्तांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’) असून एकाच रेल्वेमार्गावर समोरासमोर ट्रेन्स आल्या तरी या संरक्षण प्रणालीमुळे त्या आधीच थांबतील आणि टक्कर टळेल असे सांगितले गेले होते. स्वतः रेल्वेमंत्र्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मग तरीही शुक्रवारची भीषण रेल्वे दुर्घटना घडलीच कशी? दोन नव्हे, तर तीन-तीन रेल्वेगाड्यांची टक्कर येथे झाली. कुठे गेले तुमचे ते ‘संरक्षण कवच’?”, असा सवाल मोदी सरकारला केला आहे.

हेही वाचा >> ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव

जनतेला दाखविलेली ही ‘कवचकुंडले’ फक्त रेल्वेमंत्र्यांनी प्रात्यक्षिक दाखविलेल्या रेल्वे गाडय़ांनाच होती, असे आता म्हणायचे का? या संरक्षण कवचाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जाईल, या तुमच्या आश्वासनाचे काय झाले? संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर त्यावर सरकारकडे काय उत्तर आहे?

ADVERTISEMENT

प्रायश्चित घेणार की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेचा सवाल

“288 प्रवाशांनी प्राण गमावले. त्यांना निव्वळ अपघाती मृत्यू कसे म्हणणार? सुरक्षित रेल्वे प्रवासाचा वादा करणाऱ्या मोदी सरकारच्या फौल ठरलेल्या दाव्यांनी घेतलेले हे बळी आहेत. त्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल. तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा घसरलेले डबे यावर खापर फोडून सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही”, अशा शब्दात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदी सरकार टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maharashtra politics : भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, रणनीती ठरली!

“पंतप्रधानांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, जखमींची विचारपूस केली, सांत्वन केले, मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना धीर दिला, हे सगळे ठीक असले तरी सरकार म्हणून तुमच्या उत्तरदायित्वाचे काय? नुकसानभरपाईच्या रकमा आणि सहवेदना हे ना या प्रश्नाचे उत्तर आहे ना प्रायश्चित्त. या भीषण आणि भयंकर दुर्घटनेचे प्रायश्चित्त सरकार घेणार की नाही?”, असा सवाल शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT