ड्रग्ज प्रकरणावरून पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…
Pankaja munde speech : भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केले. पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पोलिसांची सध्या ड्रग्ज रॅकेटविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक झाली. त्यावरून राजकारण पेटलं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील ठाकरे गटाचा पदाधिकारी होता म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. आता याच प्रकरणावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. पंकजांनी मांडलेली भूमिका हा देवेंद्र फडणवीसांना घरचा असल्याचे म्हटले जात आहे.
ललित पाटीलवरून विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले होते की,’ललित पाटील याला अटक झाली 10-11 डिसेंबर 2020 रोजी. अटक झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यावेळी ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते. आता आश्चर्य बघा की, त्यांना अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला.’
हे ही वाचा >> ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ
पंकजा मुंडे ड्रग्ज प्रकरणावर काय बोलल्या?
“किती दिवस झाले ड्रग्जची बातमी चाललीये. टीव्हीवर ऐकायली असेल ना… ड्रग्ज कुणी आणलं? कुणी घेतलं? कुणाच्या मुलाने घेतलं? कुणाच्या काळात आलं? असं म्हणण्याला काही अर्थ नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.