पहलगाममधील पर्यटकांना मदत करण्यावरुन महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई, या 3 गोष्टींचा अर्थ काय?

ऋत्विक भालेकर

Pahalgam Terror Attack: भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना विशेष विमानाने काश्मीरला जाण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. तर मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना पनवेल आणि डोंबिवलीहून मृतदेह घेऊन जाणारे विमान मुंबईला पोहोचेल तेव्हा मुंबई विमानतळावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई

point

तीन नेत्यांचे तीन वेगवेगळे निर्णय

point

शिंदे थेट काश्मीरमध्ये दाखल

point

तीन वेगवेगळ्या गोष्टींचा राजकीय अर्थ काय?

Mahayuti on Pehalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला. त्यानंतर आता अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करतंय. मात्र, महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय श्रेयासाठी लढाई सुरू झाली आहे. महायुती आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि पीडितांच्या कुटुंबियांसाठी मदत आणि बचाव कार्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. शिंदेंनी नगरविकास विभागाच्या बैठका रद्द केल्या. त्यांनी ठाण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमाला गेले.

एकनाथ शिंदे थेट काश्मीरला

अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले. एका खाजगी चार्टर्ड विमानाने शिंदे काश्मीरला रवाना झाले. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असं म्हटलं आहे की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, एकनाथ शिंदे हे सर्वात आधी मदतीसाठी पोहोचतात.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : ठाणे, रायगड, रत्नागिरीत उष्ण व दमट हवामान! कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी या विषयावर चर्चा केली. काश्मीरमधून पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एक विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणाच शिंदेंनी यावेळी केली. त्यानंतरच ही श्रेयवादाची लढाई असल्याची चर्चा सुरू झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp