PM मोदींची अजित दादांसमोरच शरद पवारांवर जहरी टीका
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. कृषिमंत्री असताना त्यांनी (शरद पवारांनी) शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
ADVERTISEMENT
Pm Narendra Modi Criticize Sharad Pawar Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे (Sharad Pawar) नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. कृषिमंत्री असताना त्यांनी (शरद पवारांनी) शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थित केला. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी भाजपने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांची आणि कामांची माहिती दिली. (pm narendra modi criticize sharad pawar nilwande dam inauguration of the canal shirdi news)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.शिर्डीच्या पावन भुमीला माझे कोटी कोटी नमन 100 वर्ष पुर्ण झाले तेव्हा मला साई बाबाच्या दर्शनाचा लाभ मिळाला होता, असे मोदी यांनी सांगितले. यानंतर मोदी यांनी थेट शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : बँक मॅनेजर हत्याकांड: भावासाठी करणार होता ‘ती’ गोष्ट, पत्नीने जीवच घेतला!
महाराष्ट्राचे एक ज्येष्ठे नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्ष कुषीमंत्री राहिले आहेत. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचा सन्मानही करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांना केला आहे. तसेच सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांना फक्त एमएसपीवर साडे तीन लाख रूपये दिले. त्या तुलनेत आमच्या सरकारने 7 वर्षात साडे तेरा लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना दिल्याचे मोदी यांनी सांगितले.
हे वाचलं का?
शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हाला थेंब थेंब पाण्यासाठी ताटकळत ठेवले होते. पण आज निळवडे कालव्याचे लोकार्पण झाले. निळवंडे प्रकल्पाला 1970 ला मंजूरी मिळाली होती. ही योजना पाच दशकापासून खोळंबली. आमचे सरकार आल्यावर या प्रकल्पाला गती मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी सुरू केली. या योजनेतून देशभरातील छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 लाख 60 हजार करोड जमा झाले, तर महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यातही 26 हजार करोड जमा केल्याचे मोदी यांनी सांगितले.
हे ही वाचा : Heart Attack : हृदयविकाराने मृत्यू होऊ नये म्हणून दररोज काय करायचं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT