प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांसमोर ठेवली 'ही' अट, तब्बल...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Prakash Ambedkar On VBA Seat Sharing : महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील (MVA) वरिष्ठ नेते लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीशी लढण्यासाठी त्यांच्या आघाडीच्या 'भविष्या'वर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील बैठक सुमारे साडेतीन तास चालली. त्यानंतर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 17 जागांसाठी प्रस्ताव ठेवल्याचं म्हटलं जात आहे. त्यात ते अकोला, दिंडोरी, रामटेक, अमरावती आणि मुंबईतील एका जागेवर ठाम आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर ठेवली कोणती नवी अट?

बैठकीला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला की, 'महाविकास आघाडीचे काही सहयोगी भाजपशी बोलणी करत असल्याच्या अफवा आहेत. वंचित बहुजन आघाडी अशा दुटप्पी मानकांच्या विरोधात आहे आणि निवडणुकीपूर्वी किंवा नंतर कोणालाही त्रास देणं ते सहन करणार नाही. त्यामुळे भाजपसोबत अशी युती कोणीही करणार नाही, असे लेखी स्वरुपात प्रत्येक मित्रपक्षाला द्यावे लागेल,' अशी मागणी त्यांनी केली.

हे वाचलं का?

आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न चर्चेच्या शेवटच्या शब्दापर्यंत करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. 'सत्ताधारी आघाडीच्या कोणत्याही सदस्यासोबत मागच्या दरवाजाच्या चर्चेचे सर्व आरोप किंवा अफवा त्यांनी फेटाळून लावल्या. शिवसेना खासदार (UBT) संजय राऊत यांनीही महटलं की, 'त्यांच्यात खूप सकारात्मक चर्चा झाली असून जागावाटपाबाबत लवकरच सहमती होईल.' 


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरांना आश्वासन दिले की, ते त्यांच्या प्रस्तावावर पुढे चर्चा करतील आणि जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 9 मार्च रोजी बैठकीच्या दुसऱ्या फेरीसाठी परत भेटतील.

ADVERTISEMENT

माहितीनुसार, 'राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, 'आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणताही वाद नाही. लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आघाडी करायची आहे. आमचा प्रस्ताव आहे आणि विनंती आहे की त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे आणि मला खात्री आहे की आंबेडकर आमच्यात सामील होतील.'

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT