प्रकाश सिंह बादल यांचे निधन,सरपंच ते 5 वेळा मुख्यमंत्री,असा आहे राजकीय प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

prakash singh badal former punjab cm passed away
prakash singh badal former punjab cm passed away
social share
google news

Prakash Singh Badal Passed Away : शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मु्ख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Prakash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. गेल्या आठवड्यातच प्रकृती ठिक नसल्याने त्यांना मोहालीच्या फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. बादल यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होतोय. दरम्यान प्रकाश सिंह बादल हे कोण होते? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात. (prakash singh badal former punjab cm passed away shiromani akali dal chief punjab)

ADVERTISEMENT

देशात जेव्हा पंजाबच्या राजकारणाची चर्चा होईल तेव्हा ती शिरोमी अकाली दलाशिवाय सुरू होणार नाही आणि प्रकाश सिंह बादल (Prakash Singh Badal) यांचे नाव घेतल्याशिवाय संपणार नाही. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील लांबी विधानसभेतून ते 1997 पासून सलग 5 वेळा निवडणूक जिंकले आहेत. याच कारणांमुळे त्यांना पंजाबच्या राजकारणातला बेताज बादशाह म्हणून ओळखले जाते.

हे ही वाचा : CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…

सरपंच निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश

प्रकाश सिंह बादल राजकारण्यांच्या त्या पिढीतले आहेत, ज्यांनी गुलामगिरीचा काळ, भारताचे स्वातंत्र्य पाहिले आहे आणि स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा एक भाग होते. अवघ्या 20 वर्षाच्या वयात त्यांनी 1947 साली सरपंचाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर 1957 मध्ये ते पहिल्यांदा पंजाब विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1969 मध्ये पुन्हा एकदा प्रकाश सिंह बादल पून्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. या दरम्यान गुरनाम सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी सामुदायिक विकास, पंचायत राज, पशुपालन, डेरी आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली.

हे वाचलं का?

प्रकाश सिंह बादल यांना पंजाबच्या राजकारणाचे पितामहही म्हटले जायचे. बादल हे 5 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांनी 10 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. बादल यांनी 1970 साली पहिल्यांदा राज्याच्या 15 मुख्यमंत्रीच्या रूपात शपथ घेतली होती. यानंतर 1977 साली ते राज्याचे 19 मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. 20 वर्षानंतर त्यांनी पुन्हा सत्तेची सुत्रे हाती घेतली.मात्र यावेळी भाजपशी युतीचा राजकीय परिणाम दिसून आला.

हे ही वाचा : हजारो महिलांचं रस्त्यावर झोपून आंदोलन, रिफायनरीचा वाद काय?

1996 मध्ये भाजपसोबत युती

1996 साली भाजप आणि अकाली दल एकत्र आले आणि 1997 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढली. या एकत्रित लढण्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला होता. या निवडणूकीमुळे भापजचा पंजाबमध्ये प्रवेश झाला आणि बळकटी मिळवता आली. 1997 साली बादल यांनी राज्याच्या 28 व्या मुख्यमंत्रीच्या रुपात शपथ घेऊन कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2007 साली चौथ्यांदा आणि 2012 साली पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT