Prashant Kishor : भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

भागवत हिरेकर

Prashant Kishor Latest News Today : बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी केलीये…

ADVERTISEMENT

Prashant Kishore, the founder of Jansuraj, has given an interview to India Today.
Prashant Kishore, the founder of Jansuraj, has given an interview to India Today.
social share
google news

Prashant Kishor Prediction for Lok Sabha Election 2024 : पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध भाजप प्रणित एनडीए आणि काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष अशी स्थिती सध्या दिसत आहे. निवडणुकीबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

जनसुराजचे सुत्रधार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी भाजपच्या ‘अब की बार 400 पार’च्या घोषणेबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं. तसेच निवडणुकीचे निकाल कसे लागू शकतात, याबद्दलही त्यांचे अंदाज मांडले आहेत.

भाजपच्या ‘अब की बार 400’ नारा किती खरा होईल?

लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची घोषणा भाजपने केली आहे. याबद्दल प्रशांत किशोर म्हणाले, “बघा, हा काही खेळ सुरू नाहीये की, जे बोलू ते होईलच. 400 जागा जिंकणे सोप्पे काम नाहीये. जागा जिंकण्याचा दावा करणे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या रणनीतीचा एक भाग असतो. त्यामुळे त्यांच्या पक्षात वातावरण तयार होते.”

हेही वाचा >> आंबेडकरांचे काँग्रेससोबत सूर जुळेना! ‘वंचित’ एका अटीमुळे ‘मविआ’तून बाहेरच

“एकंदरीत सांगायचं तर मानसिकरित्या हा दबाव असतो, जो विरोधी पक्षांवर टाकला जातो. यामुळे विरोधकांचे मनोबल कमी होते. भाजप याच अनुषंगाने काम करत आहे”, असे उत्तर त्यांनी दिले.

हे वाचलं का?

    follow whatsapp