Pune Drugs Video : पुण्यात ड्रग्ज प्रकरण तापलं, सुषमा अंधारेंचा शंभूराज देसाईंवर गंभीर आरोप
Pune Drugs Video News : पुण्यातील ड्रग्ज प्रकरण तापलं आहे. या घटनेवरून आता कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनीवराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरच थेट आरोप केला. यावर शंभुराज देसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
Pune Drugs Video News : पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओही समोर आला आहे.या व्हिडिओत दोन तरूण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना दिसले आहेत. त्यामुळे पुण्यातील ड्रग्ज प्रकरण तापलं आहे. या घटनेवरून आता कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरच थेट आरोप केला. यावर शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. (pune drugs video sushama andhare ravindra dhangekar allegation on shambhuraj desai)
ADVERTISEMENT
शंभूराजेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई अरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनाशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Maharashtra Vidhan sabha : भाजप लढवणार 170 जागा? अजित पवार, शिंदेंना किती?
देसाईंचे आडनाव खाटीक असायलं हवं
रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणार देसाईंवर हल्ला चढवला आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा मी गेल्या काही दिवसांपासून घेत आहे. पोलिस आणि इतरांशी माझं पत्रव्यवहार आणि बोलणं झालं. पोलिस पथकातील काही अधिकार्यांमुळे या घटना घडत आहेत. पैसे देऊन हा प्रकार होत आहे. यावर कायमचा उपाय शोधायला हवा. तसा कायदा तयार करायला हवा. पोलिसांना पैसे देऊन काही प्रकऱणं मिटवली जातात. पुन्हा तेच सुरु होतं. कायदा आहे, पण पोलिस त्याचा वापर करत नाहीत, पैशांचा हप्ता घेऊन सर्व काही सुरु आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांचे आडनाव देसाई चुकून झालं, त्यांचं अडनाव खाटीक असायलं हवा. त्यांच्यावर आरोप केल्यावर हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणतात, असाही आरोप धंगेकर यांनी केला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Murlidhar Mohol : "मुंडे साहेबांना आज खूप आनंद झाला असता", मोहोळ झाले भावूक
दरम्यान या सर्व प्रकरणावर शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60 जणांवर कारवाई केली. हा व्हिडिओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT