Rahul Gandhi यांना पुन्हा खासदार होण्यासाठी काय आहेत पर्याय?
राहुल गांधीमोदी प्रकरणात जामीन मिळाला पण खासदारकी अद्याप वेटिंगवरचं आहे. त्यांना आता पुन्हा खासदार होण्यासाठी आहेत काय आहेत पर्याय?
ADVERTISEMENT
Congress Leader Rahul Gandhi
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मानहानीच्या खटल्यातील निकालाला आणि शिक्षेला राहुल गांधी यांनी आव्हान दिले आहे. मात्र, न्यायालयाने सध्या त्यांना केवळ जामीन मंजूर केलेला आहे. निकालाला किंवा शिक्षेला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. आता त्यांच्या जामीनावर 13 एप्रिलला सुनावणी होणार आहे, तर मानहानीच्या खटल्यावर 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. (Rahul Gandhi gets bail but what are the options to become an MP again)
मोदी आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 23 मार्च रोजी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. याच निकालाला त्यांनी आव्हान दिले आहे. सध्या त्यांच्या निकालाला अथवा शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नसल्याने ते अद्यापही खासदार म्हणून अपात्रच असणार आहेत. राहुल गांधी यांच्या टीमने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती देण्याचा आग्रह धरला होता मात्र पण दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्याशिवाय अंतरिम स्थगिती देऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.
हे वाचलं का?
आता राहुल गांधी यांच्यासमोर काय पर्याय असू शकतात?
राहुल गांधी संसदेत परत येऊ शकतात का?
होय. राहुल गांधी पुन्हा संसदेत पुन्हा येऊ शकतात. त्यांच्याकडे त्यांचे लोकसभा सदस्यत्व वाचवण्याचा पर्याय आहे. यासाठी त्यांना सभापतींनी केलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. लोकसभा सचिवालयाच्या कारवाईवर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यास त्यांचे सदस्यत्व वाचू शकते आणि ते संसदेतही परत येऊ शकतात.
हेही वाचा : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची’, अजित पवारांनी खरं काय ते सांगून टाकलं!
राहुल गांधींना त्यांचे निवासस्थान सोडावे लागेल का?
राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. राहुल गांधी दिल्लीतील लुटियन्स झोनमधील १२ तुघलक रोड येथील सरकारी निवासस्थानी राहतात. लोकसभेचे सदस्य या नात्याने त्यांना हे निवासस्थान मिळाले होते. पण आता त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना हे निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत हे निवासस्थान रिकामे करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील का?
नाही. राहुल गांधी यांचे सदस्यत्व लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत रद्द करण्यात आले आहे. यानुसार, खासदार/आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. यासोबतच शिक्षेची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवण्यात आले आहे. या आधारावर राहुल गांधींना 2024 ची निवडणूक लढवता येणार नाही, पण उच्च न्यायालय-सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यास ते पुढच्या वर्षी निवडणूक लढवू शकतील.
ADVERTISEMENT
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर
2029 ची लोकसभा निवडणूक लढवणार?
राहुल गांधी सुरत न्यायालयाच्या निर्णयाला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेवर स्थगिती दिली तर ठीक, पण यावर त्यांना दिलासा मिळाला नाही, तर राहुल गांधींना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. सुरत सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर आणि सभापतींनी केलेल्या कारवाईवरही राहुल गांधींना दिलासा मिळवायचा आहे, ही गोष्ट इथे समजून घेणे गरजेचे आहे. राहुल गांधींच्या याचिकेवर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर बंदी घातली तरी त्यांना त्यांचे सदस्यत्व पुन्हा मिळवता येणार नाही. त्यासाठी राहुल गांधींना दोषी ठरविलेल्या निकालाला स्थगिती देणे आवश्यक आहे.
वायनाड सीटचे भवितव्य काय आहे?
खासदार-आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा आमदार/खासदाराचे सभागृहाचे सदस्यत्व गेल्यास, तर त्या जागेवर पोटनिवडणुका घ्यावी लागते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम-151 (A) नुसार कोणतीही जागा (लोकसभा किंवा विधानसभा) रिक्त असल्यास त्यावर 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणुका घेणे आवश्यक आहे. ही तारीख जागा रिक्त झाल्याच्या तारखेपासून लागू होते. आता राहुल गांधींना न्यायालयातून दिलासा मिळाला नाही तर राहुल गांधींच्या वायनाड जागेवर 6 महिन्यांत पुन्हा निवडणूक होऊ शकते. राज्यघटनेनुसार सार्वत्रिक निवडणुकीला 6 महिन्यांहून अधिक कालावधी उरल्यास पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. आता मे 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, यासाठी अद्याप एका वर्षांहून अधिक काळ आहे. त्याआधी 6 महिन्यांत केरळच्या वायनाड जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगानेही यावर विचार सुरू केला आहे.
हेही वाचा : अमित शाह, तुम्ही संगमा, मिंध्येचं काय चाटताय? उद्धव ठाकरेंचा खडा सवाल
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतील का?
होय. लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर आणि मोदी आडनाव प्रकरणात दोषी आढळल्यानंतरही राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात. सदस्यत्व सोडल्यानंतरही सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक CWC ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे केली जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT