राज ठाकरेंच्या मुलीला सोशल मीडियावर कोण देतंय त्रास?, शर्मिला ठाकरे तर संतापल्याच!
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरून मुलीला आणि महिलांना दिला जाणाऱ्या त्रासबद्दल खंत व्यक्त करत आपला कायदा तकलादू झाल्याची खंत व्यक्त करत कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे त्यांना सांगितले.
ADVERTISEMENT
Sharmila Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मुलींना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी बोलताना आपल्या मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत ब्रिटीशकालीन कायदा (Law) किती तकलादू असल्याचे सांगत कायद्यात बदल होणं गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
पुन्हा पुन्हा त्रास
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सोशल मीडिया, मुलींना आणि महिलांना होणारा त्रास, तसेच कायद्यामुळे गुन्हा करणाऱ्या मुलांना अटक करून त्यांना पुन्हा तसेच सोडून देण्यात येत असल्याने त्याचा पुन्हा त्रास होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा>> Viral Video: पनीरवरून लग्नात राडा, भर मंडपात रक्ताचा सडा…
ठोस उपाय योजना नाही
शर्मिला ठाकरे यांनी स्वतःच्या घरातील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, माझ्याच मुलीला युटयूबवरून अनेक वेळा वाटेल तसे मेसेज केले जातात. त्याबाबत पोलीस कमिशनर यांच्याकडे तक्रार करूनही त्याबाबत कोणत्याही ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत त्यामुळे होणारे असे त्रास कमी होत नाहीत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे वाचलं का?
कायदा तकलादू
शर्मिला ठाकूर यांनी सोशल मीडियावर आपल्या मुलीला होणाऱ्या त्रासबद्दल थेट पोलीस कमिशनरकडे तक्रार केली होती. मात्र आपल्या देशात ब्रिटीश कालीन कायदा असल्यामुळेच तो तकलादू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्रास देणाऱ्यांना अटक केली तरी त्यांना नंतर सोडावेच लागते, त्यामुळे कायद्यात काही तरी बदल केला तर त्याचा फायदा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा>> Sunil Kedar : काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा, प्रकरण काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT