Rajeev Shukla : 'गुजरातला नको, वर्ल्ड कप फायनलचं यजमानपद मुंबईलाच द्या', आदित्य ठाकरेंच्या मागणीला BCCIने काय दिलं उत्तर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

rajeev shukla reply aditya thackeray over demand give world cup host to mumbai team india victory parade
मुंबईकडून वर्ल्ड कप फायनलच यजमानपद हिरावू नये.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फायनल एका शहराला देता येत नाही

point

फायनल एका जागेपुरती मर्यादित ठेवता येत नाही

point

मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूपच आनंद झाला.

Rajeev Shukla Reply Aditya Thackeray : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने गुरुवारी मुंबईत विजयी रॅली काढली होती. या रॅलीला मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती. क्रिकेट प्रेमींच्या या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray)यांनी मुंबईकडून वर्ल्ड कप फायनलच यजमानपद हिरावू नये,अशी मागणी केली होती. खरं तर आदित्य ठाकरेंच्या या विधानामागे गुजरातला यजमानपद देऊ नका? असाच अर्थ होता. आदित्य ठाकरेच्या या मागणीवर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात. (rajeev shukla reply aditya thackeray over demand give world cup host to mumbai team india victory parade) 

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंच्या मागणीवर आता राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलं आहे. फायनल कुठे घ्यायची हा निव्वळ आवर्तनाचा विषय आहे. ती नेहमी एका शहराला देता येत नाही. कोलकातानेही फायनलचे आयोजन केले आहे. मुंबईने फायनलचेही यजमानपद भूषवले आहे. अहमदाबादच्या मैदानाची क्षमता 1.30 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आम्ही देखील क्षमतेनुसार जाऊ...तुम्हाला एका जागेपुरते मर्यादित ठेवता येणार नाही, असे उत्तर राजीव शुक्ला यांनी दिले आहे.  

हे ही वाचा : Rohit Sharma: '...नाहीतर मी सूर्याला बसवलं असतं', रोहितची मराठीतून तुफान फटकेबाजी; भाषण जसंच्या तसं

राजीव शुक्ला पुढे म्हणाले की, मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. मुंबई नेहमीच आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असते. पण वर्ल्ड कप फायनल फक्त एकाच शहरात व्हायला हवं, असं म्हणायचं तर कोणत्याही देशात असं कधीच होत नाही, अशे देखील शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान गुरूवारी टीम इंडियाच्या मुंबईतील विजय रॅलीला मुंबईकरांनी तोबा गर्दी केली होती. या गर्दीवरून आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील उत्सव हा बीसीसीआयसाठी एक मजबूत संदेश आहे. त्यामुळे मुंबईकडून वर्ल्ड कपच्या फायनलच यजमानपद कधीही हिरावू नका, अशी मागणी केली होती. 

हे ही वाचा : Mazi Ladaki Bahin Yojana: 1500 रुपये कधी मिळणार? अजितदादांनी तारीखच सांगून टाकली!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT