Rajendra Shingne : ''बँकेच्या अडचणीमुळे नाइलाजाने अजितदादांसोबत गेलो...'', पवारांचा आमदार 'हे' काय बोलून गेला

मुंबई तक

ADVERTISEMENT

rajendra shingne big statement ajit pawar mla sharad pawar mla suresh deshmukh birthday program wardha news
मी शरद पावरांचं नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो

point

शरद पावरांशी संबंध तोडले असं काही नाही

point

आजही मी त्यांना नेता मानतो

Rajendra Shingne Big Statement : सुरेंद्र रामटेके, वर्धा : ''मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो.आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने  300 कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील'', अशी कबुली अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली आहे. शिंगणे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (rajendra shingne big statement ajit pawar mla sharad pawar mla suresh deshmukh birthday program wardha news) 

ADVERTISEMENT

वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. ''सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो, त्यामुळे मी आलो. पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो. काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाही'', असे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये, फक्त...

''मी जरी अजित दादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून जे काही शरद पावरांशी संबंध तोडले असं काही नाही, आजही मी त्यांना नेता मानतो. मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पावरांचं नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे. भविष्यात सुद्धा पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे. मी पावरांचं नेतृत्व मान्य करतो'', असे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

राजेंद्र शिंगणे पुढे म्हणाले, माझ्या करता दोन्ही पवार महत्वाचे आहेतय खर म्हटलं तर  शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे.जवळपास तीस वर्ष झाले आहे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे. असे शिंगणे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Manoj Jarange : ''शेवटी मराठा द्वेष जागा...'' जरांगेंचा नाव न घेता कुणावर निशाणा?

दरम्यान, राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सुरु असलेल्या काका पुतण्या वादातही शिंगणेंनी अजित पवारांची बाजू घेतली होती. दादांना मुख्यमंत्री होण्यापासून काकाही रोखू शकत नाहीत, असं शिंगणे यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT