Rajya Sabha Election : बंडखोर आमदारांचा काँग्रेसला धक्का! हिमाचलमध्ये गेम
Rajya sabha election 2024 Cross voting : काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने भाजपला मोठा फायदा झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा 'खेला'

बंडखोरांच्या मदतीने भाजपने दिला धक्का

हिमाचल प्रदेशमध्ये अभिषेक मनु सिंघवींचा पराभव
Rajya Sabha Election 2024 : देशातील तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या 15 जागांसाठी मंगळवारी (28 फेब्रुवारी) झालेल्या निवडणुका धक्का देणाऱ्या ठरल्या. यावेळी काँग्रेसमधील बंडखोरांना हाताशी धरून उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात भाजपने क्रॉस व्होटिंगच्या बळावर विजय मिळवला, तर कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली.
कर्नाटकात काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या. या तीन जागांवर अजय माकन, नासिर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर विजयी झाले होते. दुसरीकडे भाजपचे उमेदवार नारायण सा. भांडगे यांनी एका जागेवर विजय मिळवला. त्याच वेळी, पाचवे उमेदवार जेडीएस नेते डी कुपेंद्र रेड्डी यांचा अवघ्या 36 मतांनी पराभव झाला.
हिमाचल प्रदेशमध्ये काय झालं?
हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर, येथे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव करत विजय मिळवला. येथे 34-34 मतांवर काँग्रेसशी बरोबरी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार लकी ड्रॉद्वारे विजयी झाले.
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांवर निवडणूक झाली. येथे भाजपला आठ तर समाजवादी पक्षाला दोन जागा जिंकता आल्या.