Kirtikar vs Kadam : CM शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर? रामदास कदमांनी सांगून टाकलं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ramdas kadam claims that eknath shinde offer to gajanan kirtikar lok sabha ticket for amol kirtikar
Ramdas kadam claims that eknath shinde offer to gajanan kirtikar lok sabha ticket for amol kirtikar
social share
google news

Gajanan Kirtikar Ramdas Kadam political clash : शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमध्ये ऐन दिवाळीत राजकीय शिमगा सुरू आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून सुरू झालेला हा वाद दिवसेंदिवस वाढू लागला आहे. खासदार गजानन कीर्तिकरांनी काढलेल्या प्रेसनोटमुळे रामदास कदमांचाही पारा चढला. कीर्तिकरांना उत्तर देताना कदमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफरचा उल्लेख करत आणखी खळबळ उडवून दिली.

मुंबई Tak शी बोलताना रामदास कदमांनी गजानन कीर्तिकरांच्या आरोप आणि दाव्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “अहो गजाभाऊ, तुम्ही कसले इशारे देता? तुम्ही कधी गोरेगावच्या बाहेर पडलात का? कधी महाराष्ट्रात गेलात का? कधी कणकवलीत आलात का? तुम्ही कसले इशारे देता. संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढलाय. मी वाघासारखा लढलोय. मी डोक्याला कफन बांधून लढलोय. तुम्ही कसले इशारे देताय?”, असा उलट सवाल कदमांनी केला.

एकनाथ शिंदेंनी कीर्तिकरांना काय दिली होती ऑफर

अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तिकर एकाच ऑफिसमध्ये बसतात. यावर आक्षेप घेत रामदास कदम म्हणाले, “एकाच ऑफिसमध्ये एकमेकांना मदत करणारे तुम्ही बाप बेटे… तुम्ही पक्षाची फसवणूक करताय. मग दोघांपैकी एकजण उभं रहा ना कुणीतरी.काय अडचण आहे? तुमचा मुलगा तिकडून उभा राहिला, तर इथे पक्ष आणखी कुणाला तिकीट देईल मग.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> NCP : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदा पवार कुटंबिय एकत्र, सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर

“अरे एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं… आज मी गोपनीय गोष्ट बोलू नये की तुमच्या मुलाला इकडे आणा… इकडून मी तिकीट देतो. तुमच्या मुलाला एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायला अडचण काय आहे? ते सांगा ना मग तुम्ही. गजाभाऊ, मला सगळ्या गोष्टी उघड्या करायला लावू नका. तुम्ही प्रेसनोट काढली असली, तुम्ही ज्येष्ठ नेते असलात, तरी मला काही गोष्टींचं भान आहे”, असा पलटवार कदमांनी कीर्तिकरांवर केला.

“… त्यावेळी गजाभाऊसारखी माणसं शेपट्या घालून घरात बसली होती”

“पक्षाचे दोन नेते आपसात लढताहेत, झगडताहेत, भांडताहेत, फटाके फुटताहेत. हे चित्र महाराष्ट्रात उभं करायचं नाही म्हणून मी पथ्य पाळतोय. नारायण राणे पक्षातून गेले, त्यावेळी मी एकाकी लढत होतो. त्यावेळी गजाभाऊसारखी माणसं शेपट्या घालून घरी बसली होती. घरात लपून बसले होते. कुणी बाहेर पडत नव्हतं त्यावेळी. याची हिंमत नव्हती”, अशी घणाघाती टीका कदमांनी कीर्तिकरांवर केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘…म्हणून रामदास कदम शिवसेनेत राहिले’, अनिल परबांचा खळबळजनक गौप्यस्फोट

“अमोल कीर्तिकरांना पक्षात आणण्याबद्दल जेव्हा एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकरांना बोलले, त्यावेळी ते काय म्हणाले होते? या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले, “हे त्यांना विचारलं तर अधिक चांगलं होईल. ते म्हणालेले की माझा मुलगा माझं ऐकत नाही. मग तुम्ही तुमचा फंड त्याला देताय. तुमचा फंड तो खर्च करतोय. हे सगळं चालतंय अन् तुम्ही सांगितलं की, तुमचा मुलगा ऐकत नाही. त्यांचं वय झालंय आणि ते बेछूट काहीही बोलतात”, असा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT