Barsu Refinery: ‘खुलेआम या,मी स्वत: येतो’, भास्कर जाधव सरकारला थेट भिडणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ratnagiri barsu refinery bhaskar jadhav challenge to shinde
ratnagiri barsu refinery bhaskar jadhav challenge to shinde
social share
google news

Bhaskar jadhav direct challenge to eknath shinde government : रत्नागिरीच्या राजापूरात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) राजकारण चांगलेच तापले आहे. आजच रिफायनरीला विरोध करणाऱ्या 25 स्थानिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिलीय.तुम्ही जर म्हणताय 3 ते 4 कोटी लाख रूपयांचा प्रकल्प येतोय,1 लाख लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आहे,मग तुम्ही खुलेआमपणे चर्चा घडवा, मी स्वत: येतो,असे थेट आव्हान त्यांनी सरकारला दिलेय. (ratnagiri barsu refinery bhaskar jadhav direct challenge to eknath shinde government)

ADVERTISEMENT

लोकांच्या जीवाशी खेळून, दडपशाहीने गप्प करून, सत्यापासून दूर जाऊन, तुम्ही अशाप्रकारचे राजकारण करून आपला पक्ष जर वाढवणार असाल, तर असा भाजपा पक्ष कोकणात वाढणार नाही. कोकणातील जनता ही अत्यंत चिकीत्सक,अभ्यासू असल्याचे भास्कर जाधव (bhaskar Jadhav) यांनी म्हटलेय. तसेच कशाप्रकारे तुम्ही रोजगार देणार आहात? प्रकल्पावर कशाप्रकारे 4 लाख कोटी खर्चुन हा प्रकल्प कोकणाच अर्थकारण बदलणार, हे तु्म्ही खुलेआमपणे जाहिर व्यासपीठावर सांगा, चर्चा घडवा, मी स्वत: येतो,असे थेट आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.

हे ही वाचा : ‘आधी बोंबाबोंब, अन् नंतर…’, उदय सामंत ठाकरेंवर चिडले 

दरम्यान उद्धव ठाकरेंची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका कधीच बदलली नाही. याउलट भाजपची बदलली असल्याचा आरोप जाधव यांनी केला. नाणार प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सईने रद्द झाला होता आणि आता फडणवीसांना कोकणातील तरूणांच्या बेकारीची काळजी वाटतेय.मग त्या वेळी का रद्द केला होतात,असा खडा सवाल जाधव यांनी फडणवीसांना केला.

हे वाचलं का?

भाजप जनतेत जाऊन खुलेआम पणे का सांगत नाहीत. कारण जे भाजप सांगतो त्यापेक्षा भाजपच्या पोटामध्ये काळ आहे, म्हणून ते खुलेआम चर्चेचे धाडस दाखवत नाही, अशी टीका भास्कर जाधव (bhaskar Jadhav) यांनी केली. तसेच भाजपला फक्त राजकारण करायचंय,लोकांच भल करायचं असत तर वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प, एअर बस सारखा प्रकल्प त्यांनी तिकडे पाठवला नसता, असा आरोप देखील त्यांनी केला.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर? अचानक सुट्टीमागचं कारण काय?

अजित पवार काय म्हणाले?

बारसू रिफायनरी प्रकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडलीय. रिफायनरीचे सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असे अजित पवार म्हणाले आहेत. यासोबतच पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी देखील सरकारला विनंती केली आहे. तसेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन पवार यांनी सरकारला केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT