बच्चू कडू-राणा दाम्पत्यात संघर्ष पेटला, लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे
Bachhu kadu vs Ravi Rana Amravati Loksabha Seat : अमरावतीत लोकसभा निवडणूकी आधीच दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यामुळे दावे-दावे प्रतिदाव्यांमुळे नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी करत दावा ठोकला होता.
ADVERTISEMENT
Bachhu kadu vs Ravi Rana Amravati Loksabha Seat : : अमरावतीत लोकसभा निवडणूकी आधीच दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यामुळे दावे-दावे प्रतिदाव्यांमुळे नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी करत दावा ठोकला होता. या दाव्यानंतर आता विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी देखील दावा ठोकून बच्चू कडूंवर टीका केली आहे.( ravi rana navneet rana and bachhu kadu Conflict flares up claims and counter-claims over Lok Sabha seats)
बच्चू कडू काय म्हणाले?
अमरावती लोकसभा निवडणूकीवर आमदार बच्चू कडू (Bachhu kadu)यांनी देखील दावा केला आहे. अमरावतीत प्रहार उमेदवार देणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच राज्यात विधानसभेच्या 15 जागा लढवणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut: ‘गजाभाऊ सांगतायेत BJP आम्हाला लाथा घालतायेत, आता एक-एक कोंबडी..’, राऊत संतापले!
मी स्वतः अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो होतो.तेव्हा कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता आणि त्यात आम्ही फक्त पाच हजार मतांनी पडलो होतो.आता बऱ्यापैकी आम्ही तयारी केलेली आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर आम्ही राजकीय ताकद बऱ्यापैकी निर्माण केली आहे.आणि ते सोबत घेऊन आम्ही अमरावती लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. युतीत नाही दिली तर अपक्ष आम्ही लढू असा थेट इशाराच बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विधानसभेसाठी राज्यात 15 ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करू, शिंदे आणि भाजपचा फॉर्म्युला ठरला असला तरी आणि आम्हाला त्यात जागा नाही मिळाल्या तरीही आम्ही पंधराही जागी प्रहारच्या अपक्ष उमेदवार उभे करून विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचं आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी सांगितले आहे.
रवी राणांनी बच्चू कडूंना डिवचलं
अमरावती लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने थेट खासदार नवनीत राणा यांना बच्चू कडूंनी चॅलेंज केल आहे. प्रहारचा उमेदवार लोकसभेत राहणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्यानंतर यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दावे अनेक जण करतात. पण भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा निर्णय हा अंतिम असेल. राणा दाम्पत्य युती सोबत आहेत, असे रवी राणा (Ravi Rana) म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : New Parliament: नव्या संसद भवनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले मी…
तसेच दावे कितीही झाले, तरी सरकारचं अभिनंदन करेल. कारण दिव्यांग महामंडळ स्थापन करून खऱ्या अर्थाने आमच्या सहकाऱ्यांना त्यांनी न्याय दिला आहे. त्यामुळे सरकारचा अभिनंदनच आहे. जे दावे करतात आहे, ते सुद्धा आमचा प्रचार करतील, अशा शब्दात त्यांनी बच्चू कडूंना डिवचलं. तसेच मोदीजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. वेळेनुसार आपल्याला बदल दिसून येतील अशी सुचक प्रतिक्रिया आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT