Ravindra Waikar : ठाकरेंसोबतची निष्ठा विसर्जित, वायकरांची शिंदेंच्या सेनेत एन्ट्री!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ravindra waiker join eknath shinde shiv sena varsha bunglow udhhav thackeray maharashtra politics
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
social share
google news

Ravindra Waiker join Eknath Shinde Shivsena: दिपेश त्रिपाठी, मुंबई :  जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. वायकरांच्या या प्रवेशाने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील,अशी चर्चा होती.अखेर या चर्चेला पुर्णविराम मिळालाय. (ravindra waiker join eknath shinde shiv sena varsha bunglow udhhav thackeray maharashtra politics)   

रवींद्र वायकरांच्या शिंदेच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वायकरांनी बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेत काम केले आहे. त्यांचे मनापासून स्वागत करतो. गेली 40-50 वर्ष त्यांनी बाळासाहेबांसोबत शिवसेनेचे काम केले. मी काय, गजाभाऊ आम्ही गेले अनेक वर्ष शिवसेनच काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार राज्यभर पोहोचवण्याच काम केले आहे. 
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचे मंत्राचे पालन करण्याचे काम आम्ही केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : Saroj Patil : "मी दिवसभर रडत होते, शरदचा मला फोन आला…”,

काही लोक माझ्या आणि त्यांच्यात समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. पण आमच्यात जो संभ्रम तो दुर झाला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकार स्थापण होण्यापुर्वी अडिच वर्ष नैराश्य होते, ते आम्ही सकारात्मकतेत बदलून टाकलं. रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रवींद्र वायकर काय म्हणाले? 

खरं म्हणजे गेली 50 वर्ष शिवसेनेत काम केले आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्या वेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं केलं आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आला. पण आता ज्यावेळेला मी इथे पक्षप्रवेश करतोय त्या मागचं कारण वेगळं आहे, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Ramdas Kadam : ''भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले, पण...''

वायकर पुढे म्हणाले की, ''पहिले तर कोविड होतं त्यावेळीस कामं झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत.प्रामुख्याने आरेच्या बाबतीतल पाहाल, 173 कोटी रूपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. आरेबाबत लोकं रडत आहे की आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्वाचं असतं. असे धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही'', असे वायकर यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

माझ्या येथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यवहार करायचो. त्या 17 बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे.सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो, असेही वायकर म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सूरू आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT