Saroj Patil : "मी दिवसभर रडत होते, शरदचा मला फोन आला…”, पवारांच्या बहिणीने सांगितला भावूक प्रसंग

प्रशांत गोमाणे

Saroj Patil On Ncp Split : आपण सगळे एक होऊ या आणि सगळा भाग पिंजून काढूया आणि मोदीला हरवूया. नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही, तुम्ही सांगते पुढची पिढी जगणार नाही. तेव्हा आपण सगळे एक होऊ या, पक्ष बक्ष विसरूया, संघटीत होऊ या.

ADVERTISEMENT

'आमच्या कुटुंबात हे जे काही झालं. त्यांनी माणसं फोडली. एकेक माणसं जायला लागली.
sharad pawar, saroj patil, ajit pawar, ncp politics
social share
google news

Saroj Patil On Ncp Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाच अधिकृत चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळालं आहे. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव आणि तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस) असं चिन्ह मिळालं आहे. असे असले तरी राष्ट्रवादी पक्षातील फुटीवर चर्चा आणि दावे होत असतात. आता शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी यासंदर्भात एक घटनाक्रम सांगितला.  (sharad pawar sister saroj patil speaks on ncp splip ajit pawar vs sharad pawar ncp politics nirbhay bano kolhapur) 

निर्भय बनोच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विधीज्ञ असीम सरोदे तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे महाराष्ट्रभर दौरे करून नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बुलंद करण्यासाठी जागृत करत आहेत. या कार्यक्रमात सरोज पाटील बोलत होत्या. 

हे ही वाचा : ठाकरेंना बसणार मोठा झटका, वायकर कोणत्याही क्षणी शिंदेंच्या शिवसेनेत!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटत असताना पवार कुटुंबाची काय अवस्था होती? याबाबतचा सविस्तर प्रसंग सरोज पाटील यांनी निर्भय बनो या सभेत सांगितला. यावेळी सरोज पाटील म्हणाल्या,  ''आमच्या कुटुंबात हे जे काही झालं. त्यांनी माणसं फोडली. एकेक माणसं जायला लागली. जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळी अत्यंत वाईट वाटलं. दिवसभर माझ्या डोळ्यातून पाणी हटत नव्हतं. शरदचा ( शरद पवार) फोन आला. तो म्हणाला रडतेस काय? हिंमत ठेव, तू शारदाबाईंची लेक आहेस. डोळ्यात पाणी काढायचं नाही. आपल्या आईन लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, त्यामुळे तुझ्या जीवात जीव असेपर्यंत लढायचं असं शरद पवार म्हणाल्याचे सरोज पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान आपण सगळे एक होऊ या आणि सगळा भाग पिंजून काढूया आणि मोदीला हरवूया. नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही, तुम्ही सांगते पुढची पिढी जगणार नाही. तेव्हा आपण सगळे एक होऊ या, पक्ष बक्ष विसरूया, संघटीत होऊ या आणि आपण लोकांना जागरूक करून मोदींना घालवूया, असे सरोज पाटील म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : Ramdas Kadam : ''भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले, पण...''

हे वाचलं का?

    follow whatsapp