BJP Maharashtra: 'अजित पवारांना सोबत का घेतलं?' RSS ने भाजपवर संतापली

मुंबई तक

RSS and BJP: अजित पवार यांना भाजपने सोबत घेतल्यामुळेच महाराष्ट्रात भाजपचं नुकसान झालं असा थेट दावा Rss शी संबंधित ऑर्गनायझर मासिकात प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटलंय.

ADVERTISEMENT

'अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचं नुकसान'
'अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचं नुकसान'
social share
google news

Ajit Pawar and BJP: मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून भाजपला आरसा दाखविण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, 'लोकसभा निवडणुकीत ४०० चा आकडा पार करण्याचा नारा देणारा भाजप केवळ 240 जागांवरच अडकला, याचे कारण भाजप नेत्यांचा अतिआत्मविश्वास.  ‘आएगा तो मोदी ही’ असे मानणारे कार्यकर्ते 'ग्राउंड रिॲलिटी'पासून अनभिज्ञ राहिले.' अशा शब्दात भाजपच्या खालवलेल्या कामगिराचा आढावा घेण्यात आला. (rss mouthpiece organiser article bringing ajit pawar into mahayuti loss to bjp in maharashtra rss criticized bjp in harsh words)

महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना देखील अजित पवार यांना का सोबत घेतलं? असा सवाल संघ स्वयंसेवक रतन शारदा यांनी या लेखात उपस्थित केला आहे.

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! उमेदवार घेतला मागे

अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढा दिला गेला, पण सत्तेसाठी काँग्रेसच्या लोकांना भाजपने सोबत घेतलं, ज्यामुळे कार्यकर्त्यांना बरंच दु:ख झालं. भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या आणि 26/11 ला आरएसएसचा कट म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संघाचे स्वयंसेवक दुखावले गेलेत.

'सेल्फी शेअर करून तुम्ही जिंकत नाही'

रतन शारदा यांनी आपल्या लेखात पुढे असं म्हटलं आहे की, 'सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नव्हे तर जमिनीवर कठोर परिश्रम करून ध्येय गाठले जाते. भाजप कार्यकर्ते हे त्यांच्या आनंदातच मश्गुल होते, मोदीजींच्या जीवावर ते निर्धास्त होते. विजय आपलाच होणार असे त्यांना वाटत होते.' अशा कठोर शब्दात रतन शारदा यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp