Rupali चाकणकरांना उतावीळपणा नडला, मुंबई पोलिसांनी सांगितली ‘त्या’ घटनेची सत्यता

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rupali chakanakar state Commission women mumbai police 8 women police rape by senior cop women constable letter viral mumbai crime news
rupali chakanakar state Commission women mumbai police 8 women police rape by senior cop women constable letter viral mumbai crime news
social share
google news

मुंबई पोलीस दलातील आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बलात्कार करून त्यांना गर्भपात करायला भाग पाडल्याची घटना आज उजेडात आली होती.या संबंधित एक लेटरबॉम्ब समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलात खळबळ माजली होती. मात्र ज्या महिलांच्या नावे लेटरमधुन हे आरोप करण्यात आले होते. त्यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यामुळे या प्रकरणात खोडसाळपणा झाल्याची चर्चा आहे. असे असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakanakar) यांनी या घटनेची दखल घेतली आणि मुंबई पोलिसांना (Mumbai Police) घटनेचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. यावर आता मुंबई पोलिसांनी अशाप्रकारची कुठलीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. (rupali chakanakar state Commission women mumbai police 8 women police rape by senior cop women constable letter viral mumbai crime news)

ADVERTISEMENT

रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर एक्स या सोशल माध्यमांवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचे विविध माध्यमांतून मिळाल्याचे सांगितले. तसेच राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून पोलीस आयुक्त, मुंबई यांना या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश दिले होते.

हे ही वाचा : Sanjay Raut : न्यायमूर्ती आरोपीकडे चहा प्यायला लागले तर…’, राऊतांकडून नार्वेकरांवर झोंबणारी टीका

मुंबई पोलिसांचे चाकणकरांना उत्तर

राज्य महिला आयोगाच्या या आदेशावर मुंबई पोलिसांनी एक्स या सोशल माध्यमावर त्यांना उत्तर दिले आहे. या प्रकरणाची आम्ही सखोल माहिती घेतली असता व अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नाही आहे. त्यांचे नाव सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.त्यामुळे सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणती घटना घडलेली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. तरीही याविषयी आम्ही अधिकारीक अहवाल आपल्या कार्यालयास सादर करीत आहोत, असेही मुंबई पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

नागपाडा मोटार परिवहन विभागातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या 8 पीडित महिला नागपूर मोटार परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत आहेत. या आठ महिला पोलीस चालकांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच दोन्ही पोलीस निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात आणि आमच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असल्याचाही आरोप पत्रात केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Prakash Ambekar : “निर्णय देणार नाही, असं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला आव्हान द्यावं”

या पोलीस निरीक्षकांनी आमचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडून दरमहा एक हजार रूपये लाच स्विकारत असल्याचाही आरोप महिला शिपायांनी केला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरु आहे. या बलात्कारामुळे महिला पोलीस गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले होते. या प्रकरणी आवाज उठविला असता आमची बदली करण्यात आल्याचेही महिला शिपायांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

या पत्रात आठ महिला पोलीस शिपायांची नावे असून त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सीबीआय , गुन्हे शाखा आणि सायबर सेलमार्फत चौकशी करून सबंधित अधिकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT