‘PM मोदींनी रामासाठी उपवास केला, पण…’, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

ADVERTISEMENT

Saamana editorial Criticism of Prime Minister Narendra Modi on the inauguration of Ram Mandir
Saamana editorial Criticism of Prime Minister Narendra Modi on the inauguration of Ram Mandir
social share
google news

PM Modi: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम मंदिर (Ram Mandir) आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर ठाकरे गटाला यानिमित्ताने आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त त्याने राम मंदिरासाठी दिलेले योगदान आणि त्यासाठी केलेल्या कामाचीही त्यांना आठवण झाली आहे. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तर दुसरीकडे राम मंदिराचा मोठा उत्सव चालू असतानाच शिवसेनेच्या सामना (Samana Editorial) या मुखपत्रातून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, आज देश राममय होत असला तरी ती एक राजकीय व्यूहरचना आहे, मात्र देशात खरचं रामराज्य आलं आहे का? असा सवालही करण्यात आला आहे.

मंगल योग

सामनाच्या अग्रलेखातन टीका करताना म्हटले आहे की, एकीकडे देशात सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसत आहे, तर दुसरीकडे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचीही जयंची मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. हा खरच मंगल योग जुळून येत असल्याचेही म्हटले आहे.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘तुमचा राजकीय बाप…’, श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव घेत ठाकरेंनी भाजपला सुनावलं

ते आभार मानणार नाहीत

अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा  झाली आहे, मात्र राम मंदिरासाठी केलेल्या संघर्षात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अगदी वरच्या स्थानावर आहे, मात्र या कामासाठी भाजपचे सध्याचे असलेले नेतृत्व बाळासाहेबांचे आभार कधीच मानणार नाही. तर दुसरीकडे प्रभू रामांनी 22 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वीच्या संध्याकाळी विराजमान झाले हा योगायोगही काही कमी नाही असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोट्यवधी लोकं भूकेनं व्याकूळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामनातून टीका करताना अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. आज सगळा देश राममय झाला आहे मात्र देशात खरचं रामराज्य आलं आहे का असा सवालही करण्यात आला आहे. प्रभूरामाला आज घर त्याचं घर मिळालं आहे मात्र देशातील कोट्यवधी लोकं आज बेघर आणि अन्नाशिवाय तडफडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामासाठी उपवास केला. तर देशातील कोट्यवधी लोकांची भूक भागवण्यासाठी ते कधी उपोषण करणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ढोंगीपणाचा पर्दाफाश

भाजपच्या अयोध्या उत्सवाचा उद्देश देशात रामाच्या नावाने मोदी-मोदीचा जयघोष करणे हाच असेल तर हा ढोंगीपणाचा पर्दाफाश करण्यासाठी आजच्या काळात शिवसेनाप्रमुखांची आज गरज होती असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रीय संस्था बाहुल्या

सामनातून टीका करताना त्यांनी हे ही सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर झाले नसते तर मराठी माणूस कायम गुलामीत राहिला असता. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली गेली असता. तर महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीत गेला असता. तर महाराष्ट्र आजही दिल्लीत नव्या मुघल राजवटीविरोधात लढतो आहे, तो केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेमुळेच. तर दुसरीकडे राष्ट्रीय संस्था, न्यायालये, राज्यघटनेचे चौकीदार, निवडणूक आयोग या सगळ्या सरकारी संस्था आता सरकारच्या हातातील बाहुल्यासारख्या झाल्या आहेत. त्याचबरोबर देशात आता राष्ट्रवादाचीही व्याख्या बदलली असल्याची टीका सामनातून केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : “बालीचा राजकीय वध करावा लागेल, कारण…”, ठाकरेंनी शिंदेंविरोधात थोपटले दंड

    follow whatsapp

    ADVERTISEMENT