‘त्या’ विधेयकाचे स्वागतच पण…, ‘सामना’तून सरकारच्या वर्मावर बोट

ADVERTISEMENT

new parliament saamana editorial criticizes Prime Minister Narendra Modi and bjp government women's reservation Bill
new parliament saamana editorial criticizes Prime Minister Narendra Modi and bjp government women's reservation Bill
social share
google news

Saamana Editorial : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी नव्या संसद भवनाचा श्रीगणेशा महिला आरक्षणाच्या विधेयकांनी (Women reservation bill) केला. त्या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा देत महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत केले. त्यावर आता सामनातून सरकारच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सामनाच्या अग्रलेखातून सनातन धर्मावर बोट ठेवत भाजपच्या (BJP) मानसिकतेवर सडकून टीका करण्यात आली आहे. हे विधेयक नव्या संसद भवनात (New Parliament building) मंजूर झाले असले तरी नरेंद्र मोदी यांचा हा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. तसेच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (President Draupadi Murmu) यांना आमंत्रित करण्यात आले नसल्यामुळे त्यावरूनही टीका करत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा गंभीर आरोपही सामनातून करण्यात आला आहे. (saamana editorial criticizes Prime Minister Narendra Modi and bjp government women’s reservation Bill)

महिलांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांनी…

सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरकारच्या वर्मावर बोट ठेवतान त्यांनी सध्याची लोकसभेची परिस्थिती आणि आता आरक्षणामुळे बदलणाऱ्या राजकीय गोष्टींवरूनच सरकारवर त्यांनी टीका केली आहे. सध्या लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, या विधेयकामुळे त्या 181 होणार आहेत. मात्र बऱ्याच महिला राजकीय घराणेशाहीतूनच संसदेत येणार आहेत. तेव्हा महागाई, कौटुंबिक हिंसा, शोषण, बलात्कार, खून, त्यातून बळी पडलेल्या असंख्य ‘निर्भयां’चा न्याय कोण करणार? असा सवाल सामनातून केला आहे.

हे ही वाचा >> Gautami Patil : कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी, कारण…

भव्यतेची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाची सुरुवात महिला आरक्षण विधेयकांनी केली आहे. त्यामुळे नव्या संसद भवनाच्यानिमित्ताने सरकारचे राजकीय हेतू लक्षात येतात अशी टीकाही त्यांनी केली आहे. महिला आरक्षण विधेयकाला आज कोणीही विरोध केला नसला तरी सनातन धर्माच्या प्रतिष्ठेला मात्र नक्कीच धक्का लागला असल्याचा गंभीर आरोप सामनातून केला आहे. कारण महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले तरी ते गेल्या कित्येक वर्षापासून रखडले होते. त्यावेळीही त्याला विरोध झाला होता असा टोमणा त्यांनी सरकारबरोबरच विरोध पक्षालाही टोमणा लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा राजकीय डाव

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सरकारला धारेवर धरले जात असतानाच सामनातून ते विधेयक गेल्या 13 वर्षापासून ते वनवासात कसे होते हेही त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर बारा वर्षानी आणि नव्या संसद भवनच्या पहिल्या दिवशीच हे विधेयक नरेंद्र मोदी यांनी मंजूर करुन त्यांनी राजकीय डाव कसा केला आहे तेही त्यांनी सांगितले आहे. कारण 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय हक्क देण्याचा डाव टाकला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?

काहींचा अहंकार दुखावला

नरेंद्र मोदी यांनी भव्यदिव्यतेने हे विधेयक लोकसभेत आणले असले तरी या महिला आरक्षणाच्या विधेयकामुळे अनेकांचा अहंकार दुखावला असल्याची टीका त्यांनी केली आहे. महिलांना आरक्षण देऊन महिलांच्या विकासाला चालना दिली गेली तरी नव्या संसद भवनच्या उद्घाटनाला मात्र राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना उपस्थित राहू न दिल्यामुळे या सरकारची मानसिकता कळते. यावरुनच कोणा कोणाचा अहंकार दुखावला गेला आहे हे दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

सभागृहाचा मासळी बाजार होईल

संसदेत सध्या 78 महिला खासदार आहेत. तरीही संसदेत आणि विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात का? यावर आजपर्यंत बरीच चर्चा झाली आहे. महिलांना आरक्षण दिले तर सभागृहाचा मासळी बाजार होईल व गांभीर्य निघून जाईल, अशी गंभीर टीकाटिपणीही करण्यात आली होती असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT