"महाराष्ट्राचं पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलंय, कारण..."; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut Press Conference
Sanjay Raut Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

point

शरद पवारांच्या Z प्लस सुरक्षेबाबत संजय राऊत काय म्हणाले? 

point

बदलापूरच्या घटनेवरही संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut Press Conference : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या प्रकरणावरून पोलीस खात्यावरही संशयाची सुई फिरकत असल्याची माहिती समोर आलीय. तसच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. संपूर्ण राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटला आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही, असा खळबळजनक आरोपही राऊतांनी केला आहे. 

ADVERTISEMENT

संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

तुमचे पोलीस कुचकामी आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत. संघाची कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? या राज्यीतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीने नेमणुका झाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधीत आहे का? हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक द्या. संपूर्ण राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटला आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही. मुंबई-ठाण्यातील पोलिसांच्या बदल्या-बढत्या का थांबवल्या आहेत? याचं कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. बदल्या आणि बढत्यांचं टेंडर निघालं आहे.

हे ही वाचा >> Sharad Pawar Z Plus Security : शरद पवारांना आत्ताच का दिली Z प्लस सुरक्षा? 

हे वाचलं का?

शरद पवारांच्या Z प्लस सुरक्षेबाबत संजय राऊत काय म्हणाले? 

या टेंडरमध्ये जी बोली आहे ती लारद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवार काय म्हणाले? वली जात नाही. असं असल्यावर बदलापूर, कोल्हापूर, अंबरनाथ मध्ये ज्या घटना घडल्या त्या घडत राहतील.विरोधकांचा काटा काढण्यासाठी, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही पोलिसांना गुंतवून ठेवलं आहे. शरद पवारांच्या सुरक्षेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इशारे दिले जायचे. इकडे तिकडे जाऊ नका, इथे तुम्हाला धोका आहे. जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठंतरी अडकवून ठेवायचं. त्याच्यावर दबाव आणायचा. त्याची इत्यंभूत माहिती घ्यायची. केंद्रान सुरक्षा दिली हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा अपमान आहे.

हे ही वाचा >> Petrol Pump Scam: सावधान! पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा; 'इथे' चुकलात तर बसेल मोठा फटका

ADVERTISEMENT

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांना घरगड्यासारख वागवलं जात आहे. एखाद्या राज्यात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा कायदा आणि सुव्यस्थेबाबत अराजक निर्माण होतो. शरद पवार साहेबांना केंद्राची सेक्युरिटी दिली आहे. याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही, असा याचा अर्थ होतो. जर तुम्हाला पवार साहेबांसारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते, महाराष्ट्रात तुमचंच राज्य आहे. ५०-६० जवान त्यांच्यासोबत राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस जसं आमच्या मुलींचं रक्षण करू शकत नाहीत, त्याच पद्धतीने आमचे प्रमुख नेते आहेत, त्यांचंही रक्षण करू शकत नाहीत. संपूर्ण राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटला आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही, असंही राऊत म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT