Sanjay Raut : ‘आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर…’, राऊतांचा अजित पवारांना थेट इशारा
तसेच हे सर्व्हे बिर्व्हे झूठ आहे. 2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रातही इंडिया आघाडीचं सरकार येतंय, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Criticize Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांना पाडण्याचे चँलेंज घेतले होते. या चँलेंजवर अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभारही मानले होते. आता पवार-कोल्हे वादात ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” असे सांगून शिरूर मध्ये कोल्हेंचीच हवा असल्याचे संजय राऊत यांनी अधोरेखित केले. तर आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut criticize ajit pawar on amol kolhe shetkari akrosh morcha maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सांगता शनिवारी पुणे जिल्हाधिकार्यालयासमोर झाली. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी भाषणात अजित पवार यांची मिमिक्री करत प्रतिक्रिया दिली. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” असे सांगून शिरूर मध्ये कोल्हेंचीच हवा असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
हे ही वाचा : Ind vs SA : दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
राऊत पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्र, शेतकरी लुटला जातोय. महाराष्ट्राने देशाचे पोट भरले आहे. मात्र, आज महाराष्ट्रात बेरोजगारी. येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला जातोय. त्यापेक्षा एकदा गुजरातला सोन्याने मढवून टाका, आमचे काही म्हणणे नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसेच उद्योग न्याल, मराठी माणसाचे मनगट कसे न्याल. आम्ही पुन्हा लढू आणि साम्राज्य उभे करू . धैर्य, शौर्य, अभिमान आमच्या रक्तात आहे, असे राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Viral Video : बापरे! जळजळत्या, धगधगत्या चितेजवळच वृद्ध गेला झोपी, कारण…
तसेच हे सर्व्हे बिर्व्हे झूठ आहे. 2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रातही इंडिया आघाडीचं सरकार येतंय. ज्याप्रकारचं वातावरण आम्ही बघतोय ते अत्यंत आशावादी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT