Sanjay Raut : “मोदीजी ढोंग बंद करा’, तुमच्या बाजूला 70 हजार कोटींचा घोटाळा उभा”

मुंबई तक

ADVERTISEMENT

MP of Shiv Sena UBT Sanjay Raut hits out at pm narendra modi over nda meeting.
MP of Shiv Sena UBT Sanjay Raut hits out at pm narendra modi over nda meeting.
social share
google news

INDIA vs NDA : युपीएचं विसर्जन करत विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीची (indian national developmental inclusive alliance) घोषणा केली. विरोधकांच्या नव्या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत टीका केली. भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्यावरून आता शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी मोदींवर पलटवार केला. ढोंग बंद करा, लोकांना तुमचं ढोंग कळायला लागलंय, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut Reaction on indian national developmental inclusive alliance)

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “26 पक्षांची बैठक झाली. हे 26 पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेले आहेत. आम्ही जमतोय म्हटल्यावर मोदींनी एनडीएची आठवण झाली. 9 वर्षात त्यांना एनडीए आठवली नाही. त्यांना मित्रपक्ष आठवले नाही. आपले सहकारी आठवले नाही. आम्ही पाटण्याला, बंगळुरूला एकत्र आलो, त्यानंतर मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील पक्षांनी त्यांचा सत्कारच केला पाहिजे. ही भीती आहे. आमच्या आघाडीची इंडियाची भीती आहे.”

तो इंडियांचा अवमान नाही का? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊत पुढे म्हणाले, “मोदींनीच व्होट फॉर इंडिया घोषणा द्यायच्या का? मोदींच्या जुन्या घोषणा बघा. मोदी फॉर इंडिया. त्याबद्दल काय बोलणार. मोदींचे लोक बोलतात मोदी इज इंडिया. मग हा इंडियाचा अवमान नाही का? मोदी प्रचारसभांमध्ये म्हटले आहेत, आम्ही म्हणजे इंडिया. मोदी, भाजप म्हणजे इंडिया नाही. या देशातील प्रत्येक व्यक्ती इंडिया आहे.”

हे वाचलं का?

वाचा >> NDA vs INDIA : कुणाची किती ताकद? कुंपणावरचे पक्ष ठरणार किंगमेकर?

नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांचा उल्लेख न करता हल्ला चढवला. भाजपकडून अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. त्याचबरोबर इक्बाल मिर्चीशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात ईडीकडून प्रफुल पटेल यांची चौकशी सुरू आहे. यावरच राऊतांनी बोट ठेवलं.

वाचा >> Kirit Somaiya : सोमय्यांचे सर्व व्हिडीओ मुंबई पोलीस घेणार ताब्यात, कारण…

खासदार संजय राऊत म्हणाले, “मोदीजींनी म्हणाले की, हे जे जमले आहेत. ते भ्रष्टाचाऱ्यांच्या संघटन आहे. अरे तुमच्या बाजूला 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा आहे. पाठीमागे इक्बाल मिर्ची उभा आहे. हे सगळे भ्रष्टाचारी तुम्ही बाजूला घेऊन तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता. हे ढोंग बंद करा. लोकांना कळतंय, तुमचं ढोंग”, असा टोला मोदींना राऊतांनी लगावला.

ADVERTISEMENT

‘तुम्हाला आता एनडीएची आठवण झाली’

“तुम्हाला आता एनडीएची आठवण झाली. आम्ही 26 लोक एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचं कमळ फुलायला लगलं. तोपर्यंत एनडीए कुठे होतं? आम्ही भारत म्हणून, देश म्हणून एकत्र आलो, तेव्हा तुम्हाला एनडीए आठवली. हा इंडिया तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा राऊतांनी मोदींना दिला.

ADVERTISEMENT

“तुमच्याकडे तुरुंगात जाता जाता खेचलेले लोक आहेत. अमित शाहांही तुरुंगात जाऊन आलेत ना? आम्ही काही म्हणतोय का? अजित पवार तुरुंगात जायला निघालेच होते. हसन मुश्रीफ तुरुंगात जायला निघाले होते. तुमचे सगळे मुख्य कलाकार जामिनावर सुटलेले आहेत”, असं म्हणत राऊतांनी मोदींना घेरलं.

Video >> एनडीएच्या बैठकीला नरेंद्र मोदी यांची खास एन्ट्री, एकनाथ शिंदे यांना दिल्लीत मिळाला स्पेशल मान

“इंडिया नावाने राजकीय पक्ष नाहीत का? भारतीय जनता पार्टी नावात भारत आहे ना? मोदी इज इंडियाचा अर्थ काय होता? मोदींची जुनी भाषणे ऐका. भाजपला मत म्हणजे इंडियाला व्होट, याचा अर्थ काय? हे लोक या देशात ज्या प्रकारे हुकुमशाही सरकार चालवत आहेत. त्याविरोधात इंडिया निवडणूक लढेल आणि जिंकेल”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT