भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा, संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay raut serious allegation on bhima patas sugar : भीमा पाटस साखर करण्यात 500 कोटींची मनी लॉंन्ड्रींग झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला आहे. या प्रकरणात भाजपचे राहुल कुल (Rahul kul) यांच्यावर कारवाई होईल की नाही हे सांगता येत नाही.
ADVERTISEMENT
Sanjay raut serious allegation on bhima patas sugar : भीमा पाटस साखर करण्यात 500 कोटींची मनी लॉंन्ड्रींग झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला आहे. या प्रकरणात भाजपचे राहुल कुल (Rahul kul) यांच्यावर कारवाई होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण भ्रष्टाचारा संदर्भातल्या कारवाया एकतर्फी होत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. (sanjay raut serious allegation of money laundering of 500 crores in bhima patas sugar)
ADVERTISEMENT
संजय राऊत (Sanjay raut) यांची बुधवारी 26 एप्रिलला दौंड तालूक्यातील वरंवड येथे सभा पार पडली. या सभेपुर्वी त्यांनी भीमा पाटस कारखान्याला भेट दिली होती. राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक मधूकर शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील घातला होता. यामुळे दौंडमधील राजकारण चांगलंच तापलं होतं.
हे ही वाचा : ‘राजकीय स्वार्थासाठी दंगली…’,’सामना’तून अमित शहांवर टीकास्त्र
भीमा पाटण सरकारी साखर कारखान्यात काल भेट दिली होती. त्यावेळी तिथे 144 कलम लावण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. या प्रकारावर कारखाना काय नवाज शरीफचा आहे का ?असा सवालच उपस्थित केला.राहूल कूल यांच्या दबावामुळे पोलिसांनी 144 कलम लावून आपलं हस करून घेतलं असल्याचे देखील राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
भीमा पाटण सरकारी साखर कारखान्यात 500 कोटींचं मनी लॉन्ड्रींग झाली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होईल की नाही सांगता येत नाही. सध्या ज्याप्रकारच राजकारण महाराष्ट्रात सूरू आहे, त्यामुळे भ्रष्टाचारा संदर्भातल्या कारवाया एकतर्फी होत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : ‘खारघर दुर्घटना दाबण्यासाठी…,’सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
दादा भूसेवर काय म्हणाले?
मालेवागचे दादा भूसे (Dada Bhuse) यांनी गिरणा साखऱ कारखाना बचावाच्या नावाखाली 100 कोटींच्यावर पैसे गोळा केले होते. या पैशांचा हिशेबचं नाही आहे. आता ना कारखाना वाचला, ना पैसे कुठे आहेत ते माहित नाही. हे पैसै परदेशात गेले आहे, हे मनी लॉन्ड्रींग आहे, असा देखील आरोप राऊत यांनी केला. तसेच भीमा पाटस आणि दादा भूसे याचे प्रकरण मी दिल्लीत जाऊन ईडी अकाधिऱ्यांना देणार आहे.तिथेही नाही झालं तर हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात धाव घेणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
भाजपची 60 ते 70 प्रकरणे माझ्याकडे आहेत. यामधील अनेक प्रकरण मी ईडी आणि सीबीआयकडे पाठवणार आहे. भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची टोळी निर्माण होत चालली आहे. ज्या पद्धतीने भाजपच्या वॉशिंगमशीमध्ये घातले आणि हे लोक स्वच्छ झाले, याच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते,असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT