Nawab Malik : ‘अरे बापरे’… राऊतांनी फडणवीसांना पकडलं कात्रीत, काढली जुनी प्रकरणं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sanjay Raut vs Devendra fadnavis : Maharashtra politics heats up after nawab malik joined Ajit pawar group.
Sanjay Raut vs Devendra fadnavis : Maharashtra politics heats up after nawab malik joined Ajit pawar group.
social share
google news

Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक अजित पवारांसोबत असल्याचे अखेर स्पष्ट झाले. पण, यामुळे कोंडी झाली ती भाजपची. विरोधकांनी भाजपला कात्रीत पकडलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत नका, असे सांगितले. पत्रानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी जुनी प्रकरणं काढत फडणवीसांना खिंडीत गाठलं. (Sanjay Raut First Reaction On Devendra Fadnavis letter)

ADVERTISEMENT

७ डिसेंबर रोजी नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनात दिसले. सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे भाजपला सगळीकडे लक्ष्य करण्यात आलं.

त्यावर ‘सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही. असे आमचे स्पष्ट मत आहे. आमचा या गोष्टीला विरोध आहे”, असं शब्दात फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले.

हे वाचलं का?

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेरले

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला. यावरूनच खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केले.

हेही वाचा >> ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!

संजय राऊतांनी म्हटलंय की, “अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहितच नव्हते. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी… जात मांजराची”, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना जुन्या प्रकरणावरून घेरले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

“अजित पवारांना थेट फोन करून नवाब मलिकांबद्दल सांगण्यापेक्षा पत्र ट्विट करून व्हायरल करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जनतेसमोर स्वतःची लाज वाचवण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका ठाकरे गटाने फडणवीसांच्या पत्रानंतर केली आहे.

सुषमा अंधारेंनीही साधला निशाणा

“बूँद से गयी सो हौद से नहीं आती है देवबाबू… ज्यांना पत्र लिहिताय त्याच अजितदादांवर 70हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी केले. मग मोदीजींना ही ‘सत्ता येते-जाते पण देश महत्त्वाचा’ हे समजावून सांगणारे पत्र तुम्ही लिहिणार का?”, असा सवाल अंधारेंनी केला आहे.

हेही वाचा >> सत्ताधाऱ्यांसोबत बसलेल्या नवाब मलिकांवर फडणवीसांनी केलेले ‘हे’ आरोप, अन् आज…

मलिकांमुळे भाजप का सापडली कोंडीत?

दाऊदच्या बहिणीसोबत जमीन व्यवहार केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. या व्यवहारानंतरच मुंबई बॉम्बस्फोट झाले, असे आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले होते. आता तेच मलिक अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे देशद्रोहाचा आरोप असलेले मलिक भाजपला आता कसे चालतात, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT