भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Political crisis : BJP has gained a strong foothold in the politics of Maharashtra. Now apart from CM eknath Shinde, BJP has Ajit Pawar as a big option.
Maharashtra Political crisis : BJP has gained a strong foothold in the politics of Maharashtra. Now apart from CM eknath Shinde, BJP has Ajit Pawar as a big option.
social share
google news

Current Political Situation in Maharashtra 2023 : महाराष्ट्रात रविवारी झालेल्या राजकीय उलथापालथीतून थेट दोन गोष्टी समोर आल्या. पहिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पक्ष कमकुवत झाल्याचं म्हटलं जातंय. जवळचेच नेते सोडून गेल्याने शरद पवारांची राजकीय ताकदही कमी झाली आहे. दुसऱ्यांदा भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान बळकट केले असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अजित पवार हा मोठा पर्याय भाजपच्या हातात आला आहे, ज्याचा फायदा पक्ष लोकसभा निवडणुकीत घेऊ शकतो. (Two things emerge directly from the political upheaval in Maharashtra on Sunday. Due to the break in the first NCP, it has become weak and Sharad Pawar’s political power has also decreased.)

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. आता तिसरी आणि सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे, 2024 चा प्रारंभ होण्याला सहा महिने शिल्लक असतानाच भाजपने विरोधी एकजुटीवर जोरदार हल्ला केला आहे. त्याचा फटका फक्त शरद पवारांनाच बसणार नाही, तर पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक आयोजित करणाऱ्या नितीशकुमारांसह सर्वच विरोधी पक्षांना बसणार आहे. याशिवाय पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा पुनरागमनाची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसलाही याचा फटका बसला आहे.

Maharashtra BJP : एका दगडात दोन पक्षी

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल सांगायचं झालं तर अजित पवार नावाच्या एका दगडात भाजपने दोन पक्षी मारले आहेत. भाजपने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आपली पकड घट्ट केली आहे आणि पुढील लोकसभा निवडणुकीसाठी नवीन युतीत भागीदार शोधला आहे. त्याचवेळी भाजपच्या विरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या ऐक्याला तडा गेला आहे. कारण शरद पवार हे विरोधी पक्ष नेत्यांमधील प्रमुख चेहरा असून, आता त्यांच्याच पक्षात फूट पडली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवारांची एन्ट्री, भाजप झाला बळकट

अजित पवार हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने एकप्रकारे भाजपची ताकद वाढली आहे. अजित पवारांसोबत 40 आमदार असल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे भाजपला आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीही गरज राहिलेली नाही. सध्या सरकारला एकूण 166 आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाचे 40 आमदार गेल्यास ही संख्या 126 होईल. अजित पवार यांच्यासोबत आलेले 30 आमदार जोडले, तरी सरकारला 156 आमदारांचा पाठिंबा असेल, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 11 जास्त आहेत.

वाचा >> Shiv Sena UBT : “फडणवीसांचा पोपट झाला, नवा मुख्यमंत्री मिळणार”; शिंदेंबद्दल मोठी भविष्यवाणी

यापुढच्या काळातील चित्र असं असेल की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, पण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या जोडीचंच सरकारवर वर्चस्व राहीलं. यासोबतच हे दोन्ही नेते त्यांचे मुद्दे आणि त्यांच्या समर्थकांना सत्तेचा लाभ मिळवून देण्यात आघाडीवर असतील, याबद्दल कुणाला शंका वाटू नये.

ADVERTISEMENT

लोकसभेसाठी मिळाला नवा जोडीदार

अजित पवारांसोबत तीन खासदार असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 18 जागा मिळाल्या असताना भाजप शिवसेनेसोबत होता. यावेळी शिंदे यांना इतक्या जागा मिळतील ही शक्यता कमी आहे. अजित पवार यांनी एनडीएत प्रवेश केल्याने भाजपला लोकसभेसाठी नवा जोडीदार मिळाला आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना मिळून महाराष्ट्रात आणि नंतर केंद्रात एनडीए आणखी बळकट झालेली दिसू शकते.

ADVERTISEMENT

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!

शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रात भाजपला साथीदार मिळाला, पण तरीही एवढ्या मोठ्या राज्यात युतीसाठी पक्षाला चांगल्या चेहऱ्यांची गरज होती. आता अजित पवार यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची मोठी व्होट बँक एनडीएच्या बाजूने येऊ शकते.

विरोधकांच्या एकजुटीवर आघात

यासोबतच भाजपचा हा मास्टरस्ट्रोक विरोधी एकजुटीवरही आघात करणारा आहे. विरोधकांमध्ये शरद पवार हे मोठा आणि प्रमुख चेहरा मानला जात आहे. पण, आता त्यांची अवस्था तशी नाही. पक्ष वाचवावा की राष्ट्रीय ऐक्य घडवायचे, अशी शरद पवारांची अवस्था झाली आहे. आता या बंडखोरीमुळे त्यांची नेतृत्व क्षमता आणि पक्षाला एकत्र ठेवण्याचे प्रयत्न फोल ठरताना दिसत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्याध्यक्षपदी नियुक्त केलेले प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसत आहेत. पक्षांतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या शरद पवारांना विरोधकांना एकत्र उभं ठेवणं आणखी कठीण होणार आहे.

वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?

काका आणि पुतणे समोरासमोर

आता ताज्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील सर्वात उंच नेता अशी ओळख असलेले शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार विरोधक म्हणून आमने सामने आले आहेत. अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरीच केली नाही, तर पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावाही केला आहे. 5 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षश्रेष्ठींची बैठक बोलावली आहे. अशाप्रकारे शरद पवारांसमोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाव आणि चिन्हाची दीर्घ लढाई दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT