Sharad Pawar Nawab malik : पवारांचा मलिकांना फोन, काय झालं बोलणं?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sharad Pawar Nawab malik News : मनी लॉडरिंग प्रकरणात नवाब मलिक जामिनावर सुटले. सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी वाढल्या आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी मलिकांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मलिकांना कॉल केला. (NCP President Sharad Pawar dials Nawab Malik)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले. प्रकृती बरी नसल्याने वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी मलिकांनी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. 14 ऑगस्ट रोजी मलिक बाहेर आल्यानंतर त्यांच्या स्वागताला कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे गेल्या होत्या.

शरद पवार नवाब मलिकांमध्ये काय झालं बोलणं?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नबाब मलिक यांना कॉल केला. पवारांनी फोनवरून मलिकांच्या प्रकृतीची चौकशी केली.

हे वाचलं का?

वाचा >> अजितदादांनी पवारांची साथ सोडली, पण ‘या’ दोन तरुणांनी थोपटले दंड

प्रफुल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली भेट

शरद पवारांनी कॉल करण्यापूर्वी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मलिक यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरही होत्या.

सुप्रिया सुळे होत्या स्वागताला

नवाब मलिक ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले, त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. सुप्रिया सुळे मलिकांच्या घरीही गेल्या होत्या.

ADVERTISEMENT

वाचा >> नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत सरकार मोठा निर्णय घेणार,काय म्हणाले उदय सामंत?

नबाव मलिकांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न?

अजित पवारांनी बंड केले. त्यांनी पक्षातील सर्वाधिक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केलेला आहे. पण, दुसरीकडे अजित पवार गटाकडून आणखी आमदारांना आपल्या बाजूने वळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मलिकांच्या घेतलेल्या भेटीकडे बघितलं जात आहे.

ADVERTISEMENT

यापूर्वी आमदार सरोज अहिरे आजारी असताना छगन भुजबळ यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर सरोज अहिरे यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मलिकांना मिळालेल्या जामिनावरूनही अशाच पद्धतीची उलट सुलट चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष मलिकांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT