Dhananjay Munde : ''स्व. मुंडे साहेबांचा पुतळा होऊ नये म्हणून...'', धनंजय मुडेंवर कुणी केले गंभीर आरोप?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

 sharad pawar group leader big allegation on dhananjay munde amit shah criticize sharad pawar maharashtra politics
पवारांवरील या टीकेवर शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मला बंगल्यावर बोलावून दमबाजी केली

point

सख्ख्या काकांबद्दल धनंजय मुंडे यांची काय भावना होती?

point

धनंजय मु़ंडेंवर शरद पवार गटाचा गंभीर आरोप

Sharad Pawar group leader big allegation on Dhananjay Munde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी पुण्यात शरद पवारांवर ''भ्रष्टाचाराचे सुत्रधार'' असल्याची टीका केली होती. पवारांवरील या टीकेवर शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यात अजित पवार गटाकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अमित शाह बोलत असतील,तर त्यात तथ्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेनंतर आता धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. (sharad pawar group leader big allegation on dhananjay munde amit shah criticize sharad pawar maharashtra politics) 

ADVERTISEMENT

शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडेवर टीका करताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''धनंजय मुंडे हे बोलतायत! मला त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही मला ओळखतच असाल. मी ज्यावेळी व्हॅक्स म्युझियम लोणावळा यांच्या माध्यमातून स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, शरदचंद्र पवार साहेब आणि आशाताई भोसले यांचे पुतळे बनवत होतो. त्यावेळस आमची स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचाही पुतळा बनविण्याची आमची योजना होती.

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: अर्ज भरलेल्या महिलांसाठी मोठी बातमी, सरकारचा 'तो' निर्णय अन्...

''या पुतळ्याची माहिती तुम्हाला लागताच तुम्ही मला बंगल्यावर बोलावून घेतलंत. आणि गोपीनाथ मुंडे यांचा मेणाचा पुतळा बनविलास, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नाही अशी दमबाजी मला दिलीत'', असा आरोप नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर केला. ''स्वतःच्या सख्ख्या काकांबद्दल धनंजय मुंडे यांची काय भावना होती? हे सर्व महाराष्ट्राला कळले पाहीजे. यामागे तुमचा उद्देश काय होता? काका मोठे होऊ नयेत, याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न केलात.  आज तुम्ही भलेही पंकजा ताई, पंकजा ताई करत असाल.. पण तुम्ही मला कशाप्रकारे मला दमबाजी करून पुतळा बनविण्यापासून रोखले, हे मला आता सांगावे लागत आहे'', असा आरोप देखील नितीन देशमुख यांनी केला. तसेच ''मी जे बोलतोय, ते खरे आहे की नाही? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान देखील देशमुखांनी मुडेंना दिले आहे.

हे वाचलं का?

तसेच स्वतःच्या चुलत्याबद्दल असुया असणाऱ्या नेत्याने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने स्व. गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांच्याबद्दल जे काही उद्गार काढले, हे सर्व खोटे असल्याचे देखीन नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात आपले नेते अजित पवार यांचे नाव घेतले होते, यातही तथ्य होते का? असा सवाल देखील नितीन देशमुख यांनी मुंडेंना केला आहे. 

दरम्यान आता यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana Online Form: वेबसाइटवरून अर्ज भरा; पण आधी करा 'ही' गोष्ट, तरच...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT