Sharad Pawar Kolhapur: मोदी सरकारमध्ये आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याचीही… : पवार
Sharad Pawar Kolhapur Sabha: मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. महिलांची अब्रू राखता न येणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून न देण्याचं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Kolhapur Sabha Attack on Modi Govt: कोल्हापूर: ‘आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही त्या सरकारला सत्तेवर बसायचा अधिकार नाही.’ अशा अत्यंत जहाल शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली आहे. ते कोल्हापूर येथील ‘स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार’ सभेत बोलत होते. (sharad pawar harsh criticism said modi government which does not have the power to protect the dignity of women has no right to come to power maharashtra politics news marathi)
ADVERTISEMENT
यावेळी शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका केली. ही टीका त्यांनी शेती, रोजगार यासह महिलांच्या सुरक्षेविषयीच्या मुद्द्यावर देखील केली. पाहा यावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले.
शरद पवारांची मोदी सरकारवर तुफान टीका
‘कालच्या पेपरमध्ये एक महत्त्वाची बातमी आली.. कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचं पीक घेणारा जिल्हा आहे.. इथे साखर तयार होते, गूळ तयार होतो. केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे की, साखर परदेशात जाते तिच्यावर काही तरी बंधनं घालावी. सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर निर्यात करायला परवानगी दिली ती सप्टेंबर महिना झाल्यानंतर साखर परदेशात निर्यात करता येणार नाही.’
हे वाचलं का?
‘जर साखर तयार करून आपण परदेशात नेऊ शकलो नाही तर त्या साखरेची किंमत मिळणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत ही मिळणार नाही. त्याची जबरदस्त किंमत ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना सुद्धा द्यावी लागेल.’
हे ही वाचा >> Sharad Pawar Ajit Pawar: ‘पहाटेच्या शपथविधीनंतर ठरलं की…’, पवारांच्या विधानाने खळबळ
‘जे-जे काही शेतकरी तयार करतो त्याला आवर कसा घालायचा ही भूमिका या सरकारची आहे. दिल्लीत 1 वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीची थंडी होती, त्यात ते बसले, दिल्लीचा कडक उन्हाळा होता त्यात ते बसले.. 12 महिने शेतकरी कुटुंबाच्या सर्व लोकांसह दिल्लीच्या सीमेवर बसला.. मागणी करतात आणि बारा महिने सत्तेवर बसलेले मोदी सरकार आणि त्यांचे सहकारी हे ढुंकूनही पाहायला तयार नाही. एवढा शेतकऱ्यांचा अपमान दुसऱ्या कुठल्या सरकारने या देशाच्या इतिहासात केलेला नाही.’ असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर धारेवर धरलं.
ADVERTISEMENT
‘आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही त्या सरकारला…’
‘म्हणून अशा लोकांना सत्तेत बसवायचं की नाही.. सत्तेवरुन दूर करायचं की नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचाय. एका बाजूने ही अवस्था आहे. तर दुसऱ्या बाजूने मणिपूरसारखं राज्य ईशान्य भारत याठिकाणची काही राज्यं.. ज्यामध्ये नागालँड येतं.. मणिपूर येतं, सिक्कीम येतं, अरूणाचल येतं. आज तिथली काय स्थिती आहे?’
ADVERTISEMENT
‘मणिपूरमध्ये दोन समाजात संघर्ष आहे, आया-बहिणींवर हल्ले होतात, आया-बहिणींची धिंड काढली जाते. आया-बहिणींची बेअब्रू केल्यानंतर सुद्धा ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या भगिनींना वाचविण्यासाठी सत्तेचा वापरच करत नाही. संसदेत याची चर्चा झाली तरी त्याबद्दल बोलायला तयार नाहीत. ही स्थिती आज या देशात झाली.’
हे ही वाचा >> Rohit Pawar : “राष्ट्रवादी फुटली नाही”, रोहित पवारांनी सरळ कारणच सांगितलं…
‘याचा अर्थ हा आहे की, या आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही त्या सरकारला सत्तेवर बसायचा अधिकार नाही. ही भूमिका तुम्ही-मी सगळ्यांनी सांगितली पाहिजे.’ अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
आता पवारांच्या या टीकेला भाजप नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अजित पवार गट देखील याबाबत काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT