Ajit Pawar:मोदींकडून मोठी ऑफर?, Sharad Pawar यांनी अजितदादांना दाखवली जागा!
अजित पवार हे भाजपच्या वतीने कृषीमंत्री पदाची ऑफर घेऊन आले होते. या वृत्ताचं शरद पवार यांनी खंडन केलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT

Sharad Pawar meet Ajit Pawar: बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शनिवारी (12 ऑगस्ट) पुण्यात एक गुप्त भेट झाली होती. याच भेटीबाबत आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान केलं होतं की, शरद पवारांनी भाजपसोबत यावं आणि केंद्रात कृषीमंत्री (agriculture minister)पद स्वीकारावं. अशी ऑफर घेऊन अजित पवार भेटले होते. याचबाबत आज (16 ऑगस्ट) शरद पवार यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे. (sharad pawar has denied agriculture minister offer from ajit pawar a big statement was made regarding the secret meeting in pune)
‘या बैठकीत आम्ही राजकीय चर्चाच केली नाही. आणि असं आहे की, माझ्याशी कोण चर्चा करणार?’ असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं की, अजित पवार हे मला ऑफर देण्याऐवढे मोठे नाहीत.
गुप्त भेट अन् शरद पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार कृषीमंत्री पदाची ऑफर घेऊन आले होते का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ती जी काही गुप्त बैठक होती असं तुम्ही म्हणता.. त्यामध्ये असल्या गोष्टीची काही चर्चा झाली नाही. ही गोष्ट मी जाहीरपणाने सांगितली.. भेट झाली नाही असं नाही.. ते मला भेटायला आले होते.’
‘पवार कुटुंबातील एकंदर जे काही आम्ही भाऊ-बहीण आहोत त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून… कुठल्याही कौटुंबिक प्रश्न असेल तर त्यासंबंधी माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे की, बोलायचं किंवा माझा सल्ला घ्यायचा.. त्यामुळे त्याबाबत अधिक काही अर्थ काढायचा अर्थ नाही.’