Dilip walase Patil : ‘…पवार साहेब तर आमच्या’, अजितदादांबरोबर गेलेल्या ‘त्या’ नेत्याची भावनिक साद

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad Pawar in our hearts, co-operative minister dilip valse patil
sharad Pawar in our hearts, co-operative minister dilip valse patil
social share
google news

Dilip walase Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन वेगळी चूल मांडली. अजितदादांबरोबरच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याबरोबरच दिलीप वळसे पाटील यांनी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आमदार दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. कारण दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या अगदी जवळचे नेते समजले जाते होते. त्यानंतर आज दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण देत पवार साहेबांना आम्ही सोडलेलं नाही, साहेब आमच्या हृदयात असल्याचे सांगितले. (sharad Pawar in our hearts, co-operative minister dilip valse patil emotional message)

ADVERTISEMENT

पवार साहेबांना सोडलं नाही

दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांबरोब आम्ही गेलो असलो तरी, शरद पवार यांना अजून आम्ही सोडलेलं नाही. काहीवेळा राजकीय कारणांमुळे असे निर्णय घ्यावे लागतात अशी सारवासारवही त्यांनी केली आहे.

हे ही वाचा >>  LPG Price Cut: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट, पण…

अजितदादा गटाचं स्पष्टीकरण

दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या गटाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, पवार साहेबांना आम्ही सोडलेलं नाही. कारण पवारसाहेब आमच्या ह्रदयात आहेत असं म्हणत वळसे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी साद घातली आहे.

हे वाचलं का?

वेगळा विचार करण्याची परिस्थिती

मागील 32 वर्षात विधानसभेत अनेक खात्याचे मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळाली हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच मिळालं असं म्हणत राजकारणामुळे आम्हाला असा वेगळा विचार करण्याची परिस्थिती आली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Jay Pawar: ‘दादांशी बोलून घ्या, मला सिग्नल दिला की मी लगेच..’ अजित पवारांच्या धाकट्या मुलाचं मोठं विधान

कुठल्याही पक्षात प्रवेश नाही

दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, उद्याच्या काळात तुम्हाला कुणी विचारलं तर आम्ही पक्ष बदलेला नाही. कुठल्याही पक्षात प्रवेश नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येच असल्याचेही वळसे पाटलांनी स्पष्ट करत एकत्र असल्याचाच संदेशही त्यांनी यावेळी दिला आहे.

ADVERTISEMENT

निर्णय घेतला कारण

सहकारमंत्री दिलीप वळसेपाटील आज आंबेगाव तालुक्याच्या दौरावर आहेत यावेळी लाखणगाव येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून शरद पवार यांच्यासोबत आहोत. फक्त काही कारणांमुळे आम्ही असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT