ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांचा राजीनामा; बैठकीआधीच जयंत पाटलांचं मोठं विधान

सौरभ वक्तानिया

NCP: शरद पवार हे त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमके काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil
sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil
social share
google news

Sharad Pawar Resignation: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची जी घोषणा केली आहे त्यावर ते अद्यापही ठाम आहेत. असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. (sharad pawar is still firm on the decision of his resignation said jayant patil)

पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘शरद पवार आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम’

‘पवार साहेबांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मतापासून किंवा निर्णयापासून ते अद्याप बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम आहे. पण महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते त्यांना साकडं घालत आहे. अनेक जण त्यांना हा निर्णय मागे घेण्याचा आग्रह करत आहेत. पण शरद पवार साहेब हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहेत.’

‘कार्यकर्त्यांची भावना मी पवार साहेबांपर्यंत पोहचवली. सर्वांचा आग्रह आहे की, येत्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांपर्यंत पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये अशी सर्वांची इच्छा आहे.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

‘माझ्या दिल्लीत ओळखी नाही, त्यामुळे मी अध्यक्ष…’

‘सरोज पाटील यांनी माझं अध्यक्षपदासाठी माझं नाव घेतलेलं असलं तरीही मी महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्र सोडून दिल्लीची जबाबदारी… माझ्या दुसऱ्या राज्यात ओळखीही नाही आणि संपर्कही नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्ष संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात.’

‘पवार साहेबांना तो अनुभव आहे म्हणून पवार साहेब यशस्वीपणाने देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचं काम करू शकले. पण आता पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत त्यांनी अजूनही आम्ही त्यांना सांगतोय की, असं करणं योग्य नाही. पण पक्ष पुढे नेण्यासाठी काही तरी पाऊलं टाकली पाहिजेत. अशी त्यांची भूमिका दिसतेय.’

हे ही वाचा>> मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट

‘मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्यात जास्त काळजी आहे की, म्हणून आम्हाला वाटतं की, 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा होईपर्यंत पवार साहेब अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की, त्यांनी अध्यक्षपद सोडू नये. पण पवार साहेब त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.’ असं विधान करत जयंत पाटील यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्यातच अधिक रस असल्याचे संकेत यातून दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp