मोठी ब्रेकिंग : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला! बैठकीत काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar resignation as ncp president rejected by committee. what happened in committee meeting?
Sharad Pawar resignation as ncp president rejected by committee. what happened in committee meeting?
social share
google news

Sharad Pawar resignation of ncp president rejected by committee : महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवारांनी केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. गेल्या तीन दिवसांपासून राजकारण शरद पवारांभोवती फिरत असून, पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पवारांनी निर्णय बदलण्याचा आग्रह केला. त्यानंतर आज पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून 2 मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही शरद पवारांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू असून, महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

शरद पवारांचा राजीनामा नाकारण्याचा प्रस्ताव

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. याच समितीची बैठक आज बोलवली होती. या बैठकीत शरद पवार याचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव एकमताने मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हे वाचलं का?

समितीच्या बैठकीत काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती

याबद्दल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पटेल म्हणाले, “2 मे रोजी शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानक एक महत्त्वाची सूचना केली होती की, आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”

ADVERTISEMENT

“त्यांनी त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवावी, यासाठी समिती गठीत केली होती. त्यात माझं नाव सूचवलं होतं. त्यांनी जे उद्गार व्यक्त केले, ते ऐकून आम्ही स्तब्ध झालो. असा निर्णय ते जाहीर करतील याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Sharad Pawar: कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

“सगळ्यांची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यादिवशी केला. त्या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे पक्षाचे ज्येष्ठ मान्यवरांनी शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही त्यांना सारखी विनंती त्यादिवसापासून करत राहिलो. आज देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे. या पक्षाचा आधारस्तंभ तुम्ही आहात. सगळ्यांना माहिती आहे की, देशात एक सन्मानित नेते आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांचा व्याप मोठा आहे.”

“सर्वच पक्षातील नेत्यांनी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये, अशीच भूमिका मांडली. आज महाराष्ट्रासह देशातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात वेदना आहेत. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. शरद पवारांनी आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला.”

हेही वाचा >> NCP: अवघं राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांच्या राजीनाम्याचे 6 अर्थ

“शरद पवारांनी समितीकडे जबाबदारी सोपवली होती. आज समितीची बैठक झाली. समितीने बैठकीत एक ठराव मंजूर केला आहे. सर्वानुमते आम्ही मंजूर केला आहे. हा ठराव घेऊन आम्ही शरद पवारांना भेटू आणि त्यांना विनंती करणार आहोत”, असं प्रफुल्ल पटेल समितीच्या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

समितीत कोण कोण?

या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड.

हेही वाचा >> नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट

याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दूहन यांचाही समितीमध्ये समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT