महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? शरद पवार आणि CM फडणवीस यांच्यात फोनवर झाली चर्चा, नेमकं काय घडलंय?
Sharad Pawar And CM Devendra fadnavis Phone Discussion : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर महाविकास आघाडीत राजकीय मतभेद होत असल्याच्या चर्चांणा उधाण आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवारांनी CM देवेंद्र फडणवीसांशी फोनवर केली चर्चा

शरद पवार- देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?
Sharad Pawar And CM Devendra fadnavis Phone Discussion : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर महाविकास आघाडीत राजकीय मतभेद होत असल्याच्या चर्चांणा उधाण आलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठे बदल होत असल्याचंही बोललं जात आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याची तुफान चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. शरद पवार यांनी नुकतच आरएसएसचं कौतुक केल्याचं समोर आलं आहे. राज्यात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असतानाच आज शनिवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली. परंतु, या चर्चेबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परभणी, बीडसंदर्भात ही चर्चा झाल्याचं पवार म्हणाले आहेत.
राज्याच्या सध्याच्या परिस्थितीबाबत पवार आणि फडणवीस यांच्यात खलबतं झाली. पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठं विधान केलं. माझी देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवर चर्चा झाली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर आम्ही चर्चा केली. हा परिसर शांततेत राहिला पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ती फक्त मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
पवार पुढे म्हणाले, संकटं आल्यावर तुम्ही जागरुक असायला पाहिजे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वातावरण असल्याचं दिसत आहे. बीड, परभणीत शांतता कशी निर्माण होईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ द्यायची नाही, असंही पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी 2019 ला ब्लंडर मिस्टेक केली...", चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिलं रोखठोक उत्तर
तसच सीएम देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वांनी एकत्रित येऊन बीड आणि परभणी शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बीडमध्ये समाजात दुफळी निर्माण झाल्याचं दिसत आहे. या भागात शांतता असली पाहिजे, असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे.