शरद पवार छगन भुजबळांवर बरसले; म्हणाले, “बडवे येऊ देत नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra political News latest update : On the same statement of Chhagan Bhujbal, Sharad Pawar attacked Bhujbal.
Maharashtra political News latest update : On the same statement of Chhagan Bhujbal, Sharad Pawar attacked Bhujbal.
social share
google news

Sharad Pawar Vs Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनी बैठकीत शरद पवारांच्या भोवतीचे बडवे पांडुरंगाला भेटू देत नाही, म्हणत जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांना लक्ष्य केलं. छगन भुजबळांच्या याच विधानावरून शरद पवार भुजबळांवर चांगलेच बरसले. (Sharad pawar hits out at Chhagan Bhujbal)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, “काहींनी भाषणं केली. त्याचा उल्लेख अनेकांनी केला. पांडुरंगा बडवे येऊ देत नाहीत. कसले बडवे, कसलं काय? पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात, या राज्यात कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपुरला जावं लागतं असं नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक वारीमध्ये जातात. उन्हातान्हातून जातात. अंतःकरणात एकच भावना असते की, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. पंढरीला पोहोचल्यानंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही. मंदिराला नमस्कार करतात आणि आनंदाने परत जातात. त्यामुळे ही अवस्था आपल्या सर्वांच्या समोर आली”, असा मार्मिक शब्दात पवारांनी भुजबळांना टोले लगावले.

वाचा >> ‘अजित पवारांचा नाणं खोटं म्हणून माझा फोटो लावला’, शरद पवारांचा पहिला हल्ला

“पांडुरंग म्हणायचं. आणखी काय काय म्हणायचं. गुरू म्हणायचं. आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. मला आठवतंय की, असेच नेते (छगन भुजबळ), दुर्दैवाने तुरुंगात गेले. तिथे वर्ष सहा महिने राहिले. जे प्रयत्न करायचे होते, ते प्रयत्न झाले. सुटका झाली. निवडणुका आल्या. मला काहींनी सांगितलं त्यांना संधी देऊ नका, निकाल लागेपर्यंत. मी म्हणालो त्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं, त्या अन्यायामुळे त्यांना आत बसावं लागलं. अशा वेळी त्यांना तोंडघशी पडू देणार नाही. त्याच्यामागे उभा राहीन. तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळात शिवाजी पार्कमध्ये शपथ घेताना दोन लोकांची नावं द्यायची होती. पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका आपण घेतली”, अशा शब्दात पवारांनी भुजबळांना त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> शरद पवारांचं पारडं जड की, अजित पवाराचं; कुणाकडे किती आमदार? नावं आली समोर

“मला आठवत तीन दिवसांपूर्वी सकाळी मला फोन आला (छगन भुजबळांचा). म्हणाले, साहेब हे काय चाललं? मी म्हणालो मलाही माहिती नाही काय चाललंय. पण, काहीतरी चालू आहे. ते म्हणाले, ठिक आहे. असं करतो की, मी जातो, बोलतो आणि तुम्हाला कळवतो. नंतर तीन वाजता की दोन वाजता मी पाहिलं की त्यांनी शपथच घेऊन टाकली. भारी माणसं आहेत. बघून येतो. त्यामुळे इथून पुढे बघून येतो हे सांगितलं की, जरा जपून. कारण काय करेल याचा नेम नाही”, असं म्हणत शरद पवारांनी भुजबळांना चांगलंच सुनावलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT